---Advertisement---

दुख, दर्द, पीडा! विश्वचषक खेळण्यासाठी सोडली मोठी ऑफर, पाकिस्तान संघातूनही सानियाचा पती बाहेर

On: बुधवार, ऑक्टोबर 19, 2022 4:06 PM
Shoaib-Malik
---Advertisement---

पाकिस्तान क्रिकेट संघ टी20 विश्वचषक 2022 या बहुप्रतिक्षित स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. या स्पर्धेसाठी पाकिस्तानने त्यांचा संघ आधीच जाहीर केला आहे. या स्पर्धेत आपला दम दाखवण्यासाठी संघाने ताफ्यात तगड्या खेळाडूंना सामील केले आहे. मात्र, यात एका खेळाडूला एन्ट्री दिली गेली नाही. तो खेळाडू म्हणजेच, संघाचा माजी कर्णधार शोएब मलिक होय. संघाची घोषणा झाल्यापासूनच मलिकला संघात सामील का केले नाही, अशी सर्वत्र चर्चा रंगली. अनेक आजी-माजी दिग्गजांनी तसेच क्रिकेट ऍनालिटिक्सने आपली मते मांडली, पण खूप कमी लोकांना माहिती आहे की, मलिकने या टी20 विश्वचषकासाठी कोणकोणत्या गोष्टींचा त्याग केला.

शोएब मलिक (Shoaib Malik) याला या वर्षी कॅरेबियन प्रीमिअर लीग (Caribbean Premier League) या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली होती. मात्र, त्याने पाकिस्तान संघात निवड व्हावी म्हणून या स्पर्धेत खेळण्यास नकार दिला. मात्र, शेवटी त्याला पाकिस्तानच्या संघातही सामील केले नाही.

पाकिस्तानमधील एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत शोएब मलिक याने या गोष्टीचा खुलासा केला. वकार युनूसने शोएब मलिकचे उदाहरण देत म्हटले की, त्याला जगातील अनेक टी20 लीगमध्ये खेळण्याची संधी मिळू शकत होती, पण त्याने पाकिस्तान संघाला सर्वोच्च स्थानी ठेवले.

यावर बोलताना शोएब मलिक म्हणाला की, त्याला सीपीएलमध्ये खेळण्यासाठी एकदा नाही, तर दोनदा ऑफर मिळाली होती. मात्र, त्याला टी20 विश्वचषक 2022च्या पाकिस्तान संघाचा भाग बनायचे होते. पाकिस्तानच्या कमकुवत मधल्या फळीसाठी मलिक महत्त्वाचा खेळाडू ठरू शकला असता. मात्र, निवडकर्त्यांनी म्हटले की, पाकिस्तान संघ भविष्य लक्षात घेऊन टी20 विश्वचषक 2022साठी संघाची निवड करत आहे.

अशात आता पाकिस्तानला विश्वचषकात शोएब मलिकला न घेतल्याचा पश्चाताप होतो की, नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

शोएब मलिकची आंतरराष्ट्रीय टी20 कारकीर्द
शोएब मलिकने पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये खेळताना 124 सामने खेळले. यातील 111 डावांमध्ये खेळताना 31.21च्या सरासरीने 2435 धावा चोपल्या आहेत. या धावा करताना त्याने 9 अर्धशतकेही झळकावली आहेत. यादरम्यान त्याची 75 ही सर्वोत्तम धावसंख्या राहिली आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारत- पाकिस्तान सामन्यात ‘या’ 5 गोष्टींवर असेल आख्ख्या जगाचं लक्ष, जाणून घ्या एका क्लिकवर
“टीम इंडिया विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याची शक्यता 30 टक्केच!”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---