पाकिस्तान क्रिकेट संघासाठी गुरुवारी (दि. 27 ऑक्टोबर) पर्थ येथे झालेला टी20 विश्वचषक 2022मधील 24वा सामना खूपच दुर्दैवी ठरला. या सामन्यात झिम्बाब्वे संघाने पाकिस्तानला 1 धावेने पराभूत केले. त्यामुळे पाकिस्तानला या विश्वचषकात सलग दुसऱ्यांदा पराभूत व्हावे लागले. त्यांना आधी भारताविरुद्धच्या नजीकच्या सामन्यात चार विकेट्सने पराभूत व्हावे लागले होते. आता झिम्बाब्वेविरुद्धही पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी बाबर आझम आणि संघाला खडेबोल सुनावले. मात्र, या सर्वांमध्ये पाकिस्तानच्या एका माजी खेळाडूच्या ट्वीटने सर्वांचे लक्ष वेधले. ते ट्वीट सध्या भलतेच चर्चेत आहे.
तो पाकिस्तानचा माजी खेळाडू इतर कुणी नसून कामरान अकमल (Kamran Akmal) आहे. कामरानने केलेले ट्वीट सर्वांपेक्षा वेगळे होते. त्याने झिम्बाब्वे संघाच्या विजयाचा जल्लोष करत एक व्हिडिओही शेअर केला. तसेच, त्याने त्यांची प्रशंसाही केली. त्यानंतर आता त्याला चाहते जोरदार ट्रोल करत आहेत.
चाहत्यांचे ट्वीट
कामरान अकमल त्याच्या खराब इंग्रजीमुळे यापूर्वीही भलताच ट्रोल झाला आहे. यानंतर आता एका चाहत्याने त्याच्या ट्वीटवर कमेंट करत लिहिले की, “सामना संपल्याच्या दोन तासांनंतर त्याने ट्वीट केले. कारण, दोन तास तो त्याच्या इंग्रजीतील व्याकरण तपासत होता.”
https://twitter.com/bbbbdddrtgvv/status/1585678312202031106?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1585678312202031106%7Ctwgr%5Efd7b3881ade919998658035ff3fadca0b633e815%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.livehindustan.com%2Fcricket%2Fstory-snake-spotted-pakistani-fan-trolled-kamran-akmal-on-his-zimbabwe-praising-tweet-zim-vs-pak-t20-world-cup-7275695.html
दुसऱ्या एका चाहत्याने कमेंट करत लिहिले की, “साप दिसला बघा.”
https://twitter.com/kashankhan744/status/1585670910836711425?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1585670910836711425%7Ctwgr%5Efd7b3881ade919998658035ff3fadca0b633e815%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.livehindustan.com%2Fcricket%2Fstory-snake-spotted-pakistani-fan-trolled-kamran-akmal-on-his-zimbabwe-praising-tweet-zim-vs-pak-t20-world-cup-7275695.html
आणखी एक चाहता कमेंट करत लिहिले की, “Celebration deserve you guys- Kamran Akmal”. म्हणजेच यामधून त्याने कामरान अकमलच्या इंग्रजीवर टीकेची तोफ डागली आहे.
https://twitter.com/BrightS99480451/status/1585791128888303616?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1585791128888303616%7Ctwgr%5Efd7b3881ade919998658035ff3fadca0b633e815%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.livehindustan.com%2Fcricket%2Fstory-snake-spotted-pakistani-fan-trolled-kamran-akmal-on-his-zimbabwe-praising-tweet-zim-vs-pak-t20-world-cup-7275695.html
अकमलने उशिरा ट्वीट करण्यावरही एका चाहत्याने निशाणा साधला. त्याने लिहिले की, “सामना संपून अडीच तास झाले, पण याने फोटो आता टाकला आहे. असं वाटतंय त्याने त्याच्या ट्वीटसाठी स्वत:चा खूपच वेळ घेतला.”
https://twitter.com/MegnathanV/status/1585677019647397888?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1585677019647397888%7Ctwgr%5Efd7b3881ade919998658035ff3fadca0b633e815%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.livehindustan.com%2Fcricket%2Fstory-snake-spotted-pakistani-fan-trolled-kamran-akmal-on-his-zimbabwe-praising-tweet-zim-vs-pak-t20-world-cup-7275695.html
पाकिस्तानी गोलंदाजांनी या सामन्यात शानदार प्रदर्शन करत झिम्बाब्वे संघाला 20 षटकांमध्ये 8 विकेट्स गमावत 130 धावांवर रोखले होते. मात्र, या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाला 20 षटकांमध्ये 8 विकेट्स गमावत 129 धावाच करता आल्या. त्यामुळे त्यांना नजीकच्या 1 धावेने पराभवाचा सामना करावा लागला. अशाप्रकारे कदाचित पाकिस्तान संघाच्या उपांत्य सामन्यात पोहोचण्याच्या वाटाही बंद झाल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
क्रिकेटविश्वातील सर्वात क्रेझी आकडेवारी, ऑस्ट्रेलियात आंतरराष्ट्रीय टी20मध्ये विराटच किंग!
वाद पेटला! ‘मिस्टर बीन’ने वादाला दिली फोडणी, झिम्बाब्वेच्या राष्ट्रपतींना भिडले पाकिस्तानी पंतप्रधान