पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट याने आगामी पाकिस्तान-बांग्लादेश कसोटी मालिकेपूर्वी संघाच्या फिटनेसबाबत चिंता व्यक्त केली आहे. पाकिस्तान क्रिकेट संघातील खेळाडूंचा फिटनेस ज्या स्तरावर असायला हवा होता तितका नाही. मात्र, सर्वच खेळाडू अनफिट नसल्याचंही त्यांनी सांगितलं. त्याने पाकिस्तान संघातील 3 फिट खेळाडूंची नावेही सांगितली.
सलमान बट्ट त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाला, “फिटनेस लवकर सुधारते असे तुम्हाला वाटते पण तस नाही. संघात बरेच खेळाडू अनफिट आहेत. असे नाही सगळेच अनफीट आहेत. काही खेळाडू असे आहेत जे फिटनेसच्या बाबतीत जागतिक क्रिकेटमध्ये पहिल्या 10 मध्ये आहेत. शान मसूदचा फिटनेस पहा. फखर जमान आणि मोहम्मद रिझवान यांच्यापैकी, त्यांनी यो-यो चाचणीत चांगले गुण मिळवले आहेत, ते जिममध्ये देखील चांगली कामगिरी करतात आणि मैदानावर वेगाने धावतात.
पुढे बोलताना सलमान बटने वेगवान गोलंदाजांच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले. यावेळी त्यांनी चिंता व्यक्त केली की, वेगवान गोलंदाज लांब (कसोटी) फॉरमॅटमध्ये नियमितपणे खेळत नाहीत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये भाग घेत नाहीत. बट म्हणाले की, जेव्हा संघातील काही खेळाडू तंदुरुस्त नसतात तेव्हा संपूर्ण संघ अयोग्य मानला जातो, तेव्हा हे योग्य नाही.
बाबर आझमचे उदाहरण देत बट म्हणाला की, फिटनेस राखणे ही खेळाडूंची जबाबदारी आहे. “बाबर आझमने गेल्या दोन वर्षांत खूप धावा केल्या आहेत. त्याने आपली तंदुरुस्ती सिद्ध केली आहे, मैदानावर वेगवान धावा केल्या आहेत. आणि दोन्ही डावात धावा केल्या आहेत. पण फिटनेसची पातळी चांगली असली पाहिजे. सारखे ब्रेक घेणे चुकीचे आहे. दरम्यान, स्वत:ची फिटनेस राखणे ही खेळाडूंची महत्त्वाची जबाबदारी आहे.
हेही वाचा-
रिषभ पंतला बांग्लादेश मालिकेत संधी मिळणार? शमीच्या खेळावरही सस्पेंस!
बांग्लादेश मालिकेपूर्वी संघाला धक्का, सरावादरम्यान स्टार खेळाडू जखमी
विनेशच्या विरोधात मोठे षडयंत्र? 53 किग्रॅ गट सोडून 50 किग्रॅ मध्ये सहभाग का?