---Advertisement---

कहर! मोहम्मद आमिरचे उच्च कोटीचे प्रदर्शन, फक्त 1 ओव्हरमध्ये ‘एवढ्या’ फलंदाजांना धाडलं तंबूत

On: गुरूवार, डिसेंबर 7, 2023 1:42 PM
Mohammad-Amir
---Advertisement---

Mohammad Amir T10 League 2023: टी10 लीग 2023 स्पर्धेतील 23वा सामना बुधवारी (दि. 6 डिसेंबर) चेन्नई ब्रेव्हज विरुद्ध न्यूयॉर्क स्ट्रायकर्स संघात अबू धाबी येथे पार पडला. या सामन्यात न्यूयॉर्क स्ट्रायकर्स संघाने 5 विकेट्सने विजय मिळवला. या विजयाचा हिरो पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर ठरला. विशेष म्हणजे, त्याने एकाच षटकात विरोधी संघाच्या 4 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता.

झाले असे की, या सामन्यात न्यूयॉर्क स्ट्रायकर्स (New York Strikers) संघाने नाणेफेक जिंकत चेन्नई ब्रेव्हज (Chennai Braves) संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी चेन्नईने निर्धारित 10 षटकात 9 विकेट्स गमावत 75 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूयॉर्क संघाने 8.3 षटकात 5 विकेट्स गमावत 76 धावा करत 5 विकेट्सने विजय मिळवला.

आमिरने मारला विकेट्सचा ‘चौकार’
यावेळी प्रथम फलंदाजीला उतरलेल्या चेन्नई संघाच्या डावातील पहिले षटक न्यूयॉर्क स्ट्रायकर्स संघाचा फिरकीपटू अकील होसेन याने टाकले. होसेनच्या या षटकात चेन्नईचा फलंदाज जॉर्ज मुन्से याने 6 धावा केल्या. पहिले षटक संपल्यानंतर स्ट्रायकर्सचा कर्णधार कायरन पोलार्ड याने दुसरे षटक माजी क्रिकेटपटू मोहम्मद आमिर (Mohammad Amir) याच्या हातात सोपवले. या षटकात त्याने कहर गोलंदाजी करत तब्बल 4 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.

https://twitter.com/BasitCric/status/1732386928862155125

आमिरने पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवर अनुक्रमे जॉर्ज मुन्से आणि कोबे हर्फ्ट यांना तंबूचा रस्ता दाखवला. यादरम्यान आमिरने मुन्सेला रहमानुल्लाह गुरबाज याच्या हातून झेलबाद करत तंबूच पाठवले, तर हर्फ्ट याला धावबाद करत तंबूत जाण्यासाठी भाग पाडले. आमिर एवढ्यावरच थांबला नाही. त्याने षटकातील चौथ्या चेंडूवर भानुका राजपक्षे, तर अखेरच्या चेंडूवर कर्णधार चरिथ असलंका याला गुरबाजच्या हातून झेलबाद करत तंबूत पाठवले.

https://twitter.com/T10League/status/1732483169558163751

सामन्यातील त्याच्या प्रदर्शनाविषयी बोलायचं झालं, तर आमिरने आपल्या संघासाठी एकूण 2 षटके गोलंदाजी केली. यादरम्यान त्याने 3.50च्या इकॉनॉमी रेटने 7 धावा खर्च करत 4 विकेट्स घेतल्या. आमिरने चौथी विकेट जेसन रॉय याला बाद करत घेतली. (pakistani cricketer mohammad amir took 4 wickets one over chennai braves vs new york strikers t10 league 2023)

हेही वाचा-
Gautam Gambhir And S Sreesanth Fight: वादानंतर श्रीसंतचा गंभीरवर आरोप; म्हणाला, ‘तो तर वीरू भाई…’
INDvsSA: दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी कोच द्रविडचा भारतीय खेळाडूंना गुरुमंत्र; म्हणाला, ‘कठीण जागा, पण…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---