भारत आणि पाकिस्तानच्या पुरुष क्रिकेटपटूंमध्ये सामना असो वा नसो, सोशल मीडियावर त्यांची क्रेझ असते. दोन्ही संघातील खेळाडूंची जोरदार चर्चा आहे. चाहतेही तुलना करत राहतात. यापूर्वी सचिन तेंडुलकर आणि शोएब अख्तर यांच्यातील स्पर्धेची चर्चा होती. त्यानंतर काही काळ मोहम्मद आमिर आणि विराट कोहलीबद्दल चर्चा झाली. अलीकडच्या काळात आमिरची जागा शाहीन आफ्रिदीने घेतली आहे.
आता सोशल मीडियावर एका पाकिस्तानी पत्रकाराने दोन यष्टीरक्षकांची तुलना केली आहे. त्याने जगातील महान यष्टिरक्षक-फलंदाज महेंद्रसिंग धोनीची तुलना मोहम्मद रिझवानशी केली. धोनी आणि रिजवान यांच्यात तुलना होऊ शकत नाही, परंतु सोशल मीडियावर लाइक्स आणि व्ह्यूज मिळविण्यासाठी या पत्रकाराने हे केले. हे पाहून भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग संतापला. त्याचा जाहीर अपमान केला.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एका पाकिस्तानी पत्रकाराने लिहिले, “एमएस धोनी की मोहम्मद रिझवान?” कोण चांगले आहे? खरं सांग.” त्यानंतर ही पोस्ट पाहून भारतीय क्रिकेट संघाचे चाहते संतापले. त्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये तीव्र संताप व्यक्त केला.
What r u smoking nowadays ???? What a silly question to ask . Bhaiyo isko batao . DHONI bhut aage hai RIZWAN se Even if u will ask Rizwan he will give u an honest answer for this . I like Rizwan he is good player who always play with intent.. but this comparison is wrong. DHONI… https://t.co/apr9EtQhQ4
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) July 19, 2024
ही पोस्ट रिट्विट करत हरभजन सिंगने लिहिले, “तुम्ही आजकाल काय धूम्रपान करत आहात? असले मूर्ख प्रश्न विचारताय. भाऊंनो, त्याला सांगा की धोनी रिझवानपेक्षा खूप पुढे आहे. तुम्ही रिझवानला जरी विचाराल तर तो तुम्हाला प्रामाणिक उत्तर देईल.” रिझवान हा एक चांगला फलंदाज आहे. मला पण तो आवडतो पण धोनी आणि रिझवान तुलना करणे चुकीचे आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘बुमराह नाही तर..’, हा गोलंदाज सर्वात धोकादायक, मोहम्मद शमीच्या या वक्तव्याने उडाली खळबळ
श्रीलंका मालिकेपूर्वी कोहली आणि गंभीरमधील जुने मतभेद संपले? विराटनं बीसीसीआयला स्पष्टचं सांगितले
गौतम गंभीर हेड कोच बनताच केकेआरच्या खेळाडूंची चांदी, दोघांची थेट भारतीय संघात एंट्री