Hasan Ali Autograph, AUSvsPAK: बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने 241 धावांची आघाडी घेतली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलिया संघाने आपल्या दुसऱ्या डावात 6 विकेट्सच्या मोबदल्यात 187 धावा केल्या आहेत. क्रीझवर ऍलेक्स 16 धावांवर नाबाद आहे. तसेच, स्टीव्ह स्मिथ 176 चेंडू खेळून 50 धावांवर बाद होताच स्टम्प्स झाले. मात्र, ज्याप्रकारे ट्रेविस हेडने प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते, तसेच काहीसे पाकिस्तानी गोलंदाजानेही करत मैफील लुटली. त्याचा यादरम्यानचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
तिसऱ्या दिवशी पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज हसन अली (Hasan Ali) याने मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड स्टेडिअममधील प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. खरं तर, तिसऱ्या सत्रात जेव्हा स्टीव्ह स्मिथ आणि ऍलेक्स कॅरे फलंदाजी करत होते, त्यावेळी हसन अली सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत होता.
हसन अलीने चाहत्याच्या कपाळावर दिला ऑटोग्राफ
यादरम्यान हसन अली डान्स मूव्हज करताना दिसला. विशेष म्हणजे, चाहत्यांनीही त्याला साथ देत, त्याचे मूव्हज कॉपी केले. हसन अली आणि प्रेक्षकांना पाहून स्ट्राईकवर असलेला स्टीव्ह स्मिथही खळखळून हसू लागला. एवढंच नाही, तर यादरम्यान एका चाहत्याने आपल्या कपाळावर हसन अलीचा ऑटोग्राफ घेतला. यादरम्यानचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
हसन अलीच्या प्रदर्शनाविषयी बोलायचं झालं, तर ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात तो एकही विकेट घेऊ शकला नाहीये. मात्र, त्याने उच्च दर्जाची गोलंदाजी केली. त्याला विकेट मिळाली नसली, तरीही तो आपल्या अंदाजात ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी झाला. यादरम्यानचा हसन अलीचा व्हिडिओ (Hasan Ali Video) खूपच व्हायरल होत आहे.
https://twitter.com/_FaridKhan/status/1740270871787569354
https://twitter.com/cricketcomau/status/1740264929884537126
स्मिथ आणि मार्शमध्ये शानदार भागीदारी
ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाविषयी बोलायचं झालं, तर मिचेल मार्श आणि स्टीव्ह स्मिथ यांनी डाव सारवला. एकेवेळी ऑस्ट्रेलियाने 4 विकेट्स या 16 धावांवर गमावल्या होत्या. उस्मान ख्वाजा आणि ट्रेविस हेड यांना भोपळाही फोडता आला नव्हता. तसेच, डेविड वॉर्नरने 6, तर मार्नस लॅब्युशेनने 4 धावा केल्या होत्या. त्यानंतर स्मिथ आणि मिचेल मार्श यांनी 153 धावांची भागीदारी केली होती. तसेच, संघाची धावसंख्या 16 वरून थेट 169 धावांपर्यंत पोहोचवली होती. मिचेल मार्श (96) यावेळी शतक करण्यापासून चुकला. त्याला शतकासाठी 4 धावा कमी पडल्या. दुसरीकडे, स्मिथ 50 धावांवर तंबूत परतला. यावेळी शाहीन शाह आफ्रिदी आणि मीर हामजा यांनी प्रत्येकी 3 विकेट नावावर केल्या. (Pakistani Pacer hasan ali dance with melbourne crowd autograph on forehead of fan see video )
हेही वाचा-
Shocking: ‘या’ क्रिकेटपटूला दिल्ली पोलिसांकडून अटक, रिषभ पंतला लावलेला कोट्यवधी रुपयांचा चुना
INDW vs AUSW: वानखेडेत टीम इंडियाने जिंकला टॉस, करणार पहिली…






