आपण कित्येक असे उदाहरणे पाहिली आहेत, जेव्हा खेळाडू मॅच फिक्सिंग करताना आढळून आले आहेत. ज्यामुळे त्यांना खुप मोठ्या शिक्षेला सामोरे जावे लागते. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बॅट, चेंडू, मैदान आणि खेळाडू यांचे जेवढे महत्व आहे, तेवढेच महत्व अंपायर म्हणजेच पंचाचे देखील असते. खरंतर कोणत्याही खेळाचा एक अविभाज्य घटक म्हणजे पंच असतात. कोणत्याही खेळाच्या कोणत्याही सामन्यात कसलेही भांडण होऊ नये व कसल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये याच्यासाठी पंच हे महत्वाचे असतात. त्यामुळे ‘अंपायर डीसिझन लास्ट डीसिझन’ अशी म्हण प्रचलीत झाली आहे.
पण जर खेळातले निर्णय घेणाऱ्या पंचाने जर मॅच फिक्सिंग केली तर? मात्र तसेच काही तरी केले होते, पाकिस्तानी पंच आणि माजी क्रिकेटपटू असद रौफ यांनी. ज्यामुळे त्यांच्यावर चपल्या विकायची वेळ आली होती. आता अचानक (14 सप्टेंबर) त्यांचे हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाला आहे.
पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आणि 2006 ते 2013 पर्यंत आयसीसीच्या एलिट पॅनलचे सदस्य असलेले पंच असद रौफ यांना 2013 साली बीसीसीआयने बसवलेल्या शोध समितीत मॅच फिक्सिंगच्या आरोपात दोषी सापडले होते. त्यांनी २०१३ साली आयपीएल सामन्यात मॅच फिक्सिंग केल्याचे समजले होते, ज्यानंतर 2016साली बीसीसीआयद्वारे त्यांच्यावर 5 वर्षांची बंदी लावण्यात आली होती.
ज्याच्यावर ते म्हणाले होते की,’ मी आयपीएलमध्ये खुप चांगला वेळ व्यक्त केला आहे. जो पर्यंत माझ्यावर ही नामुष्कीची वेळ ओढुन नव्हती आली.’ सट्टेबाजांकडून मिळालेल्या भेटवस्तूंवर ते म्हणाले की, ‘ते आपले आले आणि ते स्वत:च आपला निर्णय देऊन गेले.’ तसेच 2012साली मुंबईच्या एका मॉडलने असद रौफवर गैरवर्तनाचा आरोप केला होता. मॉडलच्या मते रौफ यांनी तिला लग्नाचे वचन दिले हाते. ते दाघे तब्बल 10 वर्ष नात्यात देखील होते. मात्र रौफ यांनी हे सर्व आरोप 10 वर्षांपुर्वीच फेटाळुन लावले होते.
सध्या ते एक चप्पल बुटांचे दुकान चालवत होते. ते आपल्या स्टाफसाठी हे दुकान चालवत असल्याचे सांगितले होते, जेणेकरुन त्यांच्या दोन वेळेच्या जेवणाचा प्रश्न भागेल. त्यांचा एक मुलगा दिव्यांगत आहे, तर दुसरा मुलगा सध्या अमेरिकेत शिक्षण घेऊन परत मायदेशी परतला आहे. ते आपल्या बायकोसोबत आणि त्यांच्या दोन्ही मुलांसोबत राहात होते. ते म्हणाले होते की, ‘ते जे काम करतात त्यात शिखरावर जातात. त्यांनी क्रिकेट खेळले तर त्यात ते उच्च स्तरावर गेले. त्यांनी पंच म्हणुन काम केले तेव्हा ते ८ वर्ष आयसीसीच्या एलिट पॅनलचे सदस्य होते. तर आता या क्षेत्रात ही शिखरावर जाण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.’
रौफ यांनी तब्बल 231 आंतरराष्ट्रीय सामन्यात पंच म्हणुन काम केले आहे. तर ते 2006 ते 2013पर्यंत आयसीसीच्या एलिट पॅनलचे सदस्यदेखील राहिले आहेत. या दरम्यान त्यांनी 64 कसोटी, 139 एकदिवसीय तर 28 टी२० सामन्यात पंचाची भुमिका बजावली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
तब्बल 231 सामन्यांमध्ये अंपायरिंग करणाऱ्या पंचाचे आकस्मिक निधन, क्रिकेटविश्व शोकसागरात
शाहिद आफ्रिदीचे खळबळजनक वक्तव्य! म्हटला, विराटसाठी हीच योग्य वेळ आहे त्याने…
दिग्गजांचे द्वंद्व हुकले! पावसाच्या व्यत्ययाने इंडिया लिजेंड्स विरूद्ध वेस्ट इंडिज लिजेंड्स सामना रद्द