काल (५ ऑगस्ट) मॅनचेस्टर येथे इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघातील ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याची सुरुवात झाली आहे. या सामन्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने आपल्या जबरदजस्त गोलंदाजीने पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज आबिद अलीला त्रिफळाचीत केले आहे. हा इंग्लंडने पाकिस्तानला दिलेला पहिला झटका होता. आबिद आर्चरच्या दमदार इनस्विंग चेंडूचा सामना करु शकला नाही आणि केवळ १६ धावांवर बाद झाला. आबिदला आर्चरने ज्याप्रकारचा चेंडू टाकला, त्यावर कदाचितच कोणताच फलंदाज आपली विकेट वाचवू शकला नसता. आर्चरच्या त्या चेंडूची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.
पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज आबिद हा एक दमदार फलंदाज आहे. मॅनचेस्टर येथे चालू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याची फलंदाजी सरासरी १०७ होती. त्याने शान मसूदसोबत मिळून पाकिस्तानला दमदार सुरुवात करुन दिली होती. पण, १६व्या षटकात आर्चर गोलंदाजी करण्यासाठी आला आणि येताच षटकातील पहिल्या चेंडूवर त्याने आबिदला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. Abid Ali Bowled On Jofra Archer In Swinger Watch The Video
आर्चरने येताच आबिदला खूप वेगवान चेंडू टाकला. तो चेंडू आबिदच्या बॅट आणि पॅडच्या मधून निघून गेला आणि सरळ स्टंपला जाऊन लागला. आर्चरच्या या चेंडूची समालोचन करणाऱ्या सर्व दिग्गज क्रिकेटपटूंनी प्रशंसा केली.
An absolute beauty from @JofraArcher! 🔥
Live Clips: https://t.co/z8nFZ1IrGF#ENGvPAK pic.twitter.com/7ZVcO6Z5xJ
— England Cricket (@englandcricket) August 5, 2020
आबिदने त्याच्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यातच शानदार शतक ठोकले होते. डिसेंबर २०१९मध्ये श्रीलंकाविरुद्ध त्याने कसोटी पदार्पण केले होते आणि रावळपिंडी येथील पदार्पणाच्या सामन्यातील पहिल्या डावातच त्याने नाबाद १०९ धावांची खेळी केली होती. त्यानंतर कराचीमधील कसोटी सामन्यात आबिदने श्रीलंकाविरुद्ध १७४ धावांची अफलातून खेळी केली होती. मार्च २०१९ला दुबईतील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे पदार्पणाच्या सामन्यातही आबिदने ११२ धावांची शतकी खेळी केली होती. मात्र, इंग्लंडविरुद्धच्या पहिल्याच कसोटी सामन्यात तो फ्लॉप ठरला.
पाकिस्तानचा कर्णधार अजहर अलीने पहिल्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, पाकिस्तानला १९व्या षटकापर्यंत २ मोठे झटके बसले. आबिद १५.१ षटकात १६ धावांवर बाद झाला. तर कर्णधार अजहर अली केवळ ६ चेंडू खेळत १८.१ षटकात शून्य धावांवर पव्हेलियनला परतला. इंग्लंडचा गोलंदाज क्रिस वोक्सने अजहरला पायचीत केले. शान मसूद (४६ धावा) आणि बाबर आझम (६९ धावा) फलंदाजी करत आहेत. कसोटी सामन्याचा पहिला दिवस २ बाद १३९ धावांवर संपला.
महत्त्वाच्या बातम्या –
डीजे ब्राव्हो गाणे पुन्हा वाजले, परंतू यावेळी कारण होते वेगळे
४ पर्यांयांपैकी अॅडम गिलख्रिस्टने या क्रिकेटरला म्हटले जगातील सर्वोत्तम यष्टीरक्षक
आयसीसी वनडे क्रमवारीत विराटचे अव्वल स्थान कायम, तर रोहितच्या दुसऱ्या स्थानाला…
ट्रेंडिंग लेख –
एकाच वनडे सामन्यात दोनही कर्णधारांनी ५ वेळा केली आहेत खणखणीत शतकं, कोहलीने तर
आयपीएल २०२०- या ५ सलामी जोड्यांवर असेल सर्वांची नजर
आयपीएल २०२०- डेथ ओव्हर्समध्ये या ५ गोलंदाजांकडे असणार जगाचे लक्ष