पाकिस्तान क्रिकेट संघ (Pakistan Cricket Team) आणि त्यांच्या खेळाडूंची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. एकीकडे पाकिस्तान संघाला बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात आपल्याच मायदेशात दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. तत्पूर्वी पाकिस्तानातील अनेक खेळाडू सध्या वेस्ट इंडिजमध्ये कॅरेबियन प्रीमियर लीग खेळत आहेत. नुकताच कॅरेबियन प्रीमियर लीगचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये पाकिस्तानचा खेळाडू आझम खान (Azam Khan) फलंदाजी करताना बाऊन्सरच्या फटक्यामुळे खाली पडला आणि बाद झाला.
आझम खान (Azam Khan) कॅरेबियन प्रीमियर लीगमधील गयाना ॲमेझॉन वॉरियर्सचा भाग आहे. बार्बुडा फाल्कन्सविरुद्धच्या सामन्यात आझमला ही दुखापत झाली. सामन्याच्या 12व्या षटकात हा प्रकार घडला. स्प्रिंगर फाल्कन्ससाठी षटक टाकत होता. आझमनं त्याच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर चौकार मारला होता.
— Cricket Cricket (@cricket543210) August 31, 2024
मात्र, स्प्रिंगरने तिसरा चेंडू टाकला, ज्याला आझम खानकडे उत्तर नव्हते. स्प्रिंगरचा बाऊन्सर आझमला महागात पडला. कारण चेंडू थेट त्याच्या मानेवर लागला. चेंडू लागल्यानंतर आझम पूर्णपणे विचलीत झाला. आझमला चेंडू लागल्यानंतर तो थेट स्टंपवर गेला आणि बोल्ड झाला. त्यानं या सामन्यात 9 चेंडूत केवळ 9 धावा केल्या आणि तंबूत परतला.
आझम खानच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्यानं पाकिस्तानसाठी 2021 मध्ये पदार्पण केलं होतं. आझमनं पाकिस्तानसाठी 14 टी20 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यानं 88 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याची सरासरी 8.80 राहिली आहे, तर स्ट्राईक रेट 133.33 राहिला आहे. पाकिस्तानसाठी त्यानं अद्याप एकदिवसीय आणि कसोटी सामना खेळला नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
धोनी, कोहली नाही ‘हा’ भारतीय जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक! जाॅन्टी रोड्सचा मोठा खुलासा
55 चेंडू, 165 धावा; लखनऊच्या फलंदाजाचा कहर; टी20 सामन्यात तब्बल 300+ धावा
IPL 2025 पर्यंत टीम इंडियाचे वेळापत्रक समोर; चॅम्पियन्स ट्रॉफीसह या देशांसोबत खेळली जाणार मालिका