महिला टी20 विश्वचषक स्पर्धेत (Women’s T20 World Cup) न्यूझीलंडने पाकिस्तानचा 54 धावांनी दारूण पराभव केला. यासह भारतीय महिला संघ टी20 विश्वचषकातूनही बाहेर पडला आहे. गेल्या रविवारी भारताचा ऑस्ट्रेलियाकडून 9 धावांनी पराभव झाला होता. अशा परिस्थितीत पाकिस्तानने न्यूझीलंडविरूद्ध विजय मिळवला तरच भारतीय महिला संघ सेमीफायनल फेरीत पोहोचू शकत होता.
पाकिस्तान आणि न्यूझीलंड (Pakistan vs New Zealand) दोन्ही संघासाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा होता आणि दोघांनाही सेमीफायनल फेरीत स्थान पक्कं करण्याची संधी होती. दुबईच्या संथ खेळपट्टीवर प्रथम खेळताना न्यूझीलंड संघाने 110 धावा केल्या. न्यूझीलंडने पाकिस्तानसमोर 111 धावांचे आव्हान ठेवले होते. पाकिस्तानच्या विकेट्स पडायला दुसऱ्या षटकात सुरूवात झाली, त्यानंतर 28 धावा होईपर्यंत अर्धा संघ तंबूत परतला होता. पण पुढे पाकिस्तानने उर्वरित 5 विकेट्स गमावल्या. पाकिस्तानला हा सामना जिंकता आला नाही.
भारताला आजपर्यंत महिला टी20 विश्वचषक (Women’s T20 World Cup) जिंकता आला नाही. आता पुन्हा एकदा विश्वचषक ट्रॉफी उंचावण्याचे भारताचे स्वप्न भंगले आहे. भारताचे सेमीफायनल फेरीत जाण्याचे समीकरण असे बनले होते की, पाकिस्तानने न्यूझीलंडला कोणत्याही परिस्थितीत हरवले, तरच ते सेमीफायनल फेरीत प्रवेश करू शकतील. पण तसे न होता न्यूझीलंडनेच पाकिस्तानला धूळ चारून सामना आपल्या नावावर केला.
महत्त्वाच्या बातम्या-
बेजबाॅलला फ्लाॅप ठरवणार गौतम गंभीरचा ‘हा’ प्लॅन! न्यूझीलंड मालिकेपूर्वीच केले मोठे वक्तव्य
PAK vs ENG; दुसऱ्या कसोटीत बाबरच्या जागी खेळणार ‘हा’ खेळाडू
आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये एका सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारे टाॅप-5 खेळाडू