---Advertisement---

महामुकाबल्यातून पाकिस्तानचा हुकमी एक्का बाहेर! टीम इंडियाला दिलेली मोठी जखम

Pakistan-Team
---Advertisement---

ऑस्ट्रेलियात आठव्या टी20 विश्वचषकाच्या मुख्य फेरीला सुरुवात झाली आहे. मुख्य फेरीचा दुसऱ्या दिवशी भारत आणि पाकिस्तान (INDvPAK) हा बहुप्रतिक्षित सामना खेळला जाईल. 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राउंड वर हा सामना खेळला जाणार आहे. या अतिमहत्त्वाच्या सामन्यापूर्वी पाकिस्तान संघाला तगडा झटका बसला. संघाचा अनुभवी फलंदाज फखर झमान (Fakhar Zaman) हा दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध नसेल. त्याचवेळी दुसरा फलंदाज शान मसूद हा तंदुरुस्त झाला असून, तो या सामन्यासाठी उपलब्ध असेल.

भारताविरुद्धच्या सामन्याआधी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम हा पत्रकारांना सामोरा गेला. या पत्रकार परिषदेत त्याने भारताविरुद्धच्या सामन्याविषयी प्रश्नांची उत्तरे दिली. संघाचा दुखापतग्रस्त अनुभवी फलंदाज फखर झमान हा या सामन्यासाठी उपलब्ध असणार का असा प्रश्न विचारल्यानंतर बाबर म्हणाला,

“दुर्दैवाने फखर या सामन्यासाठी उपलब्ध नसेल. तो अद्याप दुखापतीतून पूर्ण सावरला नाही. मात्र, शान मसूद या सामन्यासाठी उपलब्ध असणार आहे.”

फखर याला आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती. तेव्हापासून तो कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळला नाही. विश्वचषकाच्या मुख्य संघातही त्याचा समावेश केला गेला नव्हता. मात्र, उस्मान कादीर संघातून बाहेर गेल्यानंतर त्याला संघात सामील केले गेलेले. फखर झमानने 2017 चॅम्पियन ट्रॉफी अंतिम सामन्यात आक्रमक शतक झळकावून भारताला पराभूत करण्यात मोठी भूमिका बजावली होती.

दुसरीकडे सराव सामन्यांमध्ये शानदार कामगिरी केलेल्या शान मसूदला नेट्समध्ये डोक्यावर चेंडू लागला होता. त्यामुळे त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेलेले. मात्र, तो आता पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून, या सामन्यात खेळू शकतो.

टी20 विश्वचषकासाठी पाकिस्तान संघ-

बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर झमान, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदील शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘राशिद खान असेल इंग्लंडसाठी सर्वात मोठा धोका’, माजी कर्णधाराने आधीच केले सावध
मेलबर्नवरून आनंदाची बातमी, भारत-पाकिस्तान सामन्यावरील संकटाचे ढग दूर!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---