Loading...

…म्हणून पाकिस्तानच्या या गोलंदाजाने केले विराट कोहलीचे कौतुक

काल(15 जानेवारी) आयसीसीने 2019 वर्षांचे पुरस्कार घोषित केले आहेत. यामध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीला 2019 वर्षातील खिलाडूवृत्तीसाठी पुरस्कार मिळाला आहे.

Loading...

2019 विश्वचषकादरम्यान विराटने 1 वर्षांच्या बंदीनंतर पुनरागमन करणाऱ्या स्टिव्हन स्मिथची निंदा करणाऱ्या प्रेक्षकांना त्याचे कौतुक करण्यास सांगितले होते. विराटने दाखवलेल्या या खिलाडूवृत्तीसाठी त्याला हा पुरस्कार देण्यात आला आहे.

हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर विराटने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्याच्या प्रतिक्रियेचा व्हिडिओ बीसीसीआय तसेच आयसीसीने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. आयसीसीच्या या पोस्टवर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद अमीरने कमेंट केली असून त्याने विराटचे कौतुक केले आहे.  अमीरने कमेंट केली आहे की ‘महान खेळाडूचे उच्च विचार’

Loading...

विराटने आयसीसीकडून घोषित झालेल्या पुरस्काराबद्दल प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की ‘बर्‍याच वर्षांपासून काही चुकीच्या गोष्टींमुळे लोकांच्या नजरेत आल्यानंतर आता हा पुरस्कार मिळाल्याचा खूप आनंद झाला.’

‘हा खेळाचा एक भाग आहे, आपण एकमेकांच्या खेळाडूंचा आदर केला पाहिजे. त्या क्षणी माझे वर्तन सामान्य माणसाची परिस्थिती पूर्णपणे समजून घेण्यासाठी दिलेला प्रतिसाद होता.

Loading...
Loading...

तसेच विराट म्हणाला, ‘त्याची (स्मिथची) परिस्थिती समजून घेताना मी हे केले. मला असं वाटत नाही की अशा परिस्थितीतून बाहेर पडलेल्या व्यक्तीचा गैरफायदा घ्यावा.’

तसेच विराट पुढे म्हणाला, एखाद्या संघाला पराभूत करण्यासाठी स्लेजिंग करणे वैगरे ठिक आहे. पण अशा प्रकारे खेळाडूचा अपमान करणे योग्य नाही.

हे आमच्या चाहत्यांचे प्रतिनिधित्व होऊ नये. आपण त्या दृष्टीने जबाबदारी घ्यायला हवी. कोणत्याही खेळाडूच्या भावनांना लक्ष्य करणे चूकीचे आहे. कोणत्याही स्तरावर हे अपेक्षित नाही, असेही विराटने म्हटले आहे.

त्याचबरोबर हा पुरस्कार मिळाल्याबद्दल विराटने आनंद झाला असल्याचेही सांगितले आहे.

You might also like
Loading...