---Advertisement---

PAK vs AUS । सिडनी कसोटीतून आफ्रिदीची माघार, संघाला मिळणार नवा सलामीवीर, पाहा प्लेइंग इलेव्हन

Pakistan Test Squad
---Advertisement---

पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हन घोषित केली आहे. उभय संघांतील कसोटी मालिकेचा हा शेवटचा सामना 3 जानेवारी रोजी सिडनी क्रिकेट ग्राउंडवर सुरू होईल. या सामन्यासाठी निवडलेल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये पाकिस्तान संघ व्यवस्थापनाने दोन महत्वाचे बदल केले आहेत.

पाकिस्तान संघ (Pakistan Team) मागच्या काही दिसांपासून तीन सामन्यांच्या या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. मालिकेतील तिसरा आणि महत्वाचा कसोटी सामना बुधवारी (3 जानेवारी) सुरू होईल. या सामन्याच्या एक दिवस आधीच दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हन समोर आल्या आहेत. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी याला तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी निवडले गेले नाहीये. त्याच्या जागीक साजिद खान याला संधी दिली गेली आहे. तसेच इमाम-उल-हक या संपूर्ण मालिकेत फ्लॉप राहिल्यानंतर त्याला तिसऱ्या कसोटीत प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही. इमामच्या जागी सॅम अयूब याला पदार्पणाची संधी मिळेल.

शाहीन आफ्रिदीने तिसऱ्या कसोटीतून माघार घेण्याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाहीये. पण त्याने माघार घेणे, हे पाकिस्तान संघासाठी झटका मानले जात आहे. शाहीनने मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. शाहीनच्या जागीक संघात आलेला साजिद खान अष्टपैलू आहे. त्याने आतापर्यंत केवळ 7 कसोटी सामने खेळले आहे. 2022 नंतर त्याने एकही कसोटी सामना खेळला नाहीये. (Pakistan’s playing XI announced for Sydney Test, Shaheen Afridi out)

सिडनी कसोटीसाठी निवडली पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन –
सैम अयूब (डेब्यू), अब्दुल्ला शफीक, शान मसूद (कप्तान), बाबर आजम, सऊद शकील, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), सलमान अली आगा, साजिद खान, हसन अली, मीर हमजा, आमेर जमाल.

दरम्यान, उभय संघांतील या कसोटी मालिकेवर एक नजर टाकली, तर पहिल्या दोन सामन्यांमध्ये पाकिस्तान संघाला पराभव स्वीकारावा लागला आहे. तिसऱ्या कसोटीत जर संघ पराभूत झाला, तर त्यांना व्हाईट वॉश स्वीकारावा लागेल. पाकिस्तानने मागच्या 28 वर्षात ऑस्ट्रेलियामध्ये एकही कसोटी सामना जिंकला नाहीये. सिडनी कसोटीत विजय मिळवून संघ पराभवाचे हे सत्र थांबवू शकतो.

महत्वाच्या बातम्या – 
नेथन लायनबद्दल माजी दिग्गजाची मोठी भविष्यवाणी, म्हणाला, ‘मला आशा आहे की तो माझा…’ 
अफगाणिस्तान क्रिकेटचा ट्रॉटवर विश्वास! वर्ल्डकप परफॉर्मेंसमुळे भारत दौऱ्यात मुख्य प्रशिक्षकपदी कायम

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---