चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत सामने खेळण्यासाठी तयार करण्यात आलेली प्रमुख खेळपट्टी फलंदाजी करण्यासाठी अनुरूप आहे. यादरम्यान सगळ्यात जास्त हैरान लाहोरच्या मैदानातील खेळपट्टीने केले आहे. कारण ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंड सामन्यामध्ये एकूण 707 धावा झाल्या होत्या. तसेच 22 फेब्रुवारी पर्यंत स्पर्धेत एकूण चार सामने खेळण्यात आले होते. ज्यामध्ये चार वेळा संघांनी 300 पेक्षा अधिक धावसंख्या केली होती.
स्पर्धेत आत्तापर्यंत खूप जास्त चौकार षटकारांचा पाऊस पाडण्यात आलेला आहे. पण स्पर्धेत असेही काही संघ आहेत, ज्यांनी खूप डॉट चेंडू खेळले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यामध्ये पाकिस्तान संघाचे नाव देखील सामील आहे.
आत्तापर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या स्पर्धेत पहिल्या 20 षटकारात सगळ्यात जास्त डॉट चेंडू खेळणारा संघ अफगाणिस्तान आहे. ज्याने आत्तापर्यंत 65.8 प्रतिशत डॉट चेंडू खेळले आहेत. अफगाणिस्तानला त्यांच्या पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाकडून 107 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. दुसऱ्या स्थानी यजमान पाकिस्तान संघ आहे. पाकिस्तान संघाच्या फलंदाजांनी पहिल्या 20 षटकारात 65.4 प्रतिशत चेंडूंवर धावा केल्या नाहीत. 59.6 प्रतिशत डॉट चेंडू खेळणाऱ्या संघांच्या यादीत बांगलादेश तिसऱ्या क्रमांकावर आहे.
पाकिस्तान संघाबद्दल बोलायचे झाल्यास खास करून बाबर आझमवर खूप टीका करण्यात आली आहे. न्युझीलँड विरुद्ध त्याने 90 चेंडूत 64 धावांची खूप संथगतीने पारी खेळली. तसेच भारत विरुद्ध खेळताना त्याने 26 चेंडूत 23 धावा केल्या, परंतु यामध्ये 18 चेंडूपर्यंत त्याने धावा केल्या नाहीत.
भारतीय संघाचे रेकॉर्ड सुद्धा याबाबतीत चांगलं नाही. भारतीय संघाच्या फलंदाजांनी आतापर्यंत पहिल्या 20 षटकारात 55.7 प्रतिशत डॉट चेंडू खेळले आहेत. भारतीय संघाला स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात बांगलादेश विरुद्ध 6 विकेट्सने विजय मिळाला होता. पहिल्या सामन्यात शुबमन गिलने 101 धावांची खेळी केली होती.
डॉट चेंडू प्रतिशत
अफगाणिस्तान: -65.8
पाकिस्तान: -65.4
बांगलादेश: -59.6
न्युझीलँड:-57.3
भारत: -55.7
दक्षिण आफ्रिका: -51.6
ऑस्ट्रेलिया: – 51.6
इंग्लंड: -46.7
हेही वाचा
सामना सुरू होण्याआधीच निकाल स्पष्ट? IIT बाबांची खळबळजनक भविष्यवाणी!
संघा बाहेर असूनही बुमराहचा जलवा कायम, आयसीसी पुरस्कारांसाठी कौतुकाचा वर्षाव!
रिजवानचा मास्टरस्ट्रोक! पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय फायदेशीर ठरेल का?






