---Advertisement---

इंग्लंड दिग्गजाच्या ‘त्या’ ट्वीटवर पाकिस्तानी चाहते भडकले! म्हणाले, ‘काल पण हीच पीच होती ज्यावर…’

On: शनिवार, डिसेंबर 3, 2022 3:29 PM
Imam Ul Haq & Abdullah Shafique
---Advertisement---

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन यांनी रावळपिंडीच्या खेळपट्टीवर प्रश्न उठवले आहेत. पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड (PAKvENG) यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. यातील पहिला सामना 1 डिसेंबरपासून रावळपिंडी येथे खेळला जात आहे. ही खेळपट्टी कसोटी क्रिकेटसाठी योग्य नाही, असे वॉन यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानावरच पाकिस्तानचे चाहते खवळले असून काहींनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

झाले असे की, पाकिस्तानविरुद्ध इंग्लंडने पहिल्या डावात 657 धावसंख्या उभारली. यावेळी संघाने पहिल्याच दिवशी 500 धावांचा टप्पा पार केला, ज्यामध्ये चार फलंदाजांनी शतकी खेळी केल्या. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने 18 चेंडूत 41 धावा केल्या. पाकिस्तान संघ जेव्हा फलंदाजी करण्यास उतरला तेव्हा त्यांच्या सलामीवीरांनी देखील 200 पेक्षा अधिक धावांची भागीदारी केली.

मायकल वॉ (Michael Vaughan) यांनी ट्वीट करत कसोटीसाठी रावळपिंडी खेळपट्टी योग्य नाही असे म्हटले. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले, ‘कसोटी क्रिकेटसाठी आश्चर्यचकित करणारी खेळपट्टी’

वॉ यांच्या ट्वीटवरून पाकिस्तानी चाहते निराश झाले. यातील एकाने लिहिले, काल पण हीच खेळपट्टी होती, ‘ज्यावर इंग्लंडच्या फलंदाजांनी धावांचा डोंगर रचला. आता पाकिस्तान चांगला खेळत आहे, तर खेळपट्टी चांगली नाही.’ PAKvENG: Michael Vaughan tweet About Rawalpindi Pitch

रावळपिंडीच्या खेळपट्टीवर क्रिकेटजगतात अनेक प्रश्न उठत आहेत. ही खेळपट्टी गोलंदाजांसाठी योग्य नसल्याच्या चर्चांना उधान आले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष रमीझ राजा यांनाही हा प्रश्न विचारला गेला, तेव्हा त्यांनाही या प्रश्नाचे उत्तर माहित नव्हते. त्यांनी म्हटले, ‘माहित नाही का ही खेळपट्टी एवढी सपाट आहे?’

या सामन्यात चारही सलामीवीरांनी शतकी खेळी करत इतिहास रचला. कारण पहिल्यांदाच कसोटी क्रिकेटच्या एका सामन्याच्या पहिल्या डावात दोन्ही संघांच्या सलामीवीरांनी शतक ठोकले. इंग्लंडकडून झॅक क्राऊले (122), बेन डकेट (107) आणि पाकिस्तानकडून अब्दुल्लाह शफिक (114), इमाम उल हक (121) यांनी शतके केली आहेत.

सध्या पाकिस्तानचा पहिला डाव सुरू असून संघाने 3 विकेट्स गमावत 400चा आकडा पार केला आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यानेही शतकी खेळी केल्याने या सामन्यात आतापर्यंत सात फलंदाजांनी शतके केली आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
राष्ट्रकुल विजेता लक्ष सेन संकटात! गंभीर प्रकरणात एफआयआर दाखल
सावधान! बांगलादेशमध्ये पोहोचताच कोहलीचा ‘विराट’ सराव, फोटो व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---