पाकिस्तान क्रिकेट सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. आधी ते घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत पराभूत झाले. त्यानंतर बाबर आझमचे कर्णधारपद अडचणीत आल्याच्या आणि निवडकर्त्यांची नेमणूक अशा चर्चांना उधान आले. अशा स्थितीत पाकिस्तान घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. यातील पहिल्या सामन्यात बाबरने क्रिकेटविश्वातील मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे.
पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. यातील पहिला सामना सोमवारपासून (26 डिसेंबर) कराची येथे खेळला जात आहे. ज्यामध्ये बाबर आझम (Babar Azam) 130 धावा करत खेळपट्टीवर उपस्थित आहे. या सामन्यात त्याने 50 धावा करताच तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच वर्षात कर्णधार म्हणून सर्वाधिक वेळा 50 पेक्षा अधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. हा विक्रम करताना त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग (Ricky Ponting) याला मागे टाकले आहे.
बाबरने कर्णधार असताना 2022मध्ये आतापर्यंत 25 वेळा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 पेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. पॉंटिंगने 2005मध्ये 24 वेळा अशी कामगिरी केली होती. बाबरने या 17 वर्ष जुन्या विक्रमाला धक्का दिला आहे.
या यादीत पाकिस्तानचाच खेळाडू आहे. मिसबाह उल हक याने 2013मध्ये पाकिस्तानचे नेतृत्व करताना 22 वेळा आंतरराष्ट्रीय स्तरावर 50 पेक्षा अधिक धावा काढल्या होत्या. त्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) याचा क्रमांक लागतो. विराटने 2017 आणि 2019मध्ये प्रत्येकी 21-21 वेळा अशी कामगिरी केली होती.
BOOM 💥
Century reached in style!#PAKvNZ | #TayyariKiwiHai pic.twitter.com/krAqHkuJz0
— Pakistan Cricket (@TheRealPCB) December 26, 2022
न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा पहिले तीन फलंदाज केवळ 48 धावसंख्येवरच विकेट्स गमावून बसले. नंतर बाबरने पाकिस्तानचा डाव सांभाळला. सौद शकिल 22 धावा करत बाद झाल्याने यजमानांनी स्थिती 110 धावा 4 विकेट्स अशी झाली होती. तीन वर्षानंतर संघपुनरागमन करणाऱ्या सरफराज अहमद याने बाबरला चांगली साथ दिली. दोघांनी पाचव्या विकेटसाठी आतापर्यंत 155 धावा जोडल्या आहेत. यामुळे पाकिस्तान 4 विकेट्स गमावत 265 धावसंख्येवर आहे. Babar Azam broke Ricky Ponting’s record Virat Kohli is far behind
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ज्याने संघ फोडला त्यालाच मुख्य प्रशिक्षक बनवणार पाकिस्तान; नव्या अध्यक्षांनी दिली ऑफर
शाहीद आफ्रिदी येताच पाकिस्तानची दुर्दशा! कसोटी इतिहासात पहिल्यांदा घडली ‘ही’ गोष्ट