कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सुरक्षितता म्हणून बीसीसीआयने आयपीएल स्थगित केली. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील वनडे मालिकाही बीसीसीआयने रद्द केली आहे. परंतु या दरम्यान बीसीसीआयने आणखी एक मोठा धक्कादायक निर्णय घेतला होता.
तो असा की, भारताचा माजी कसोटी फलंदाज आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकरांना (Sanjay Manjrekar) समालोचकांच्या पॅनेलमधून काढून टाकण्यात आले आहे.
भारतातील एक चांगले समालोचन करणारे मांजरेकर त्यांच्या मागील काही वक्तव्यांमुळे बरेच वाद झाले. पण तरीही त्यांना समालोचक पॅनेलमधून काढण्याबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले जात होते. अनेकांच्या मनात एक प्रश्न उपस्थित होत आहे की, मांजरेकरांना समालोचन पॅनेलमधून का काढण्यात आले?
बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मांजरेकरांच्या कामगिरीवर बीसीसीआय खूश नव्हते.
परंतु आता याच मांजरेकरांच्या मदतीला त्यांचे एकेकाळचे भारतीय तसेच मुंबई संघातील खेळाडू चंद्रकांत पंडीत आले आहेत.
“मी संजयला लहानपणापासून ओळखतो. तो कधीही कुणालाही कोणताच त्रास देऊ शकत नाही. तो एक सरळ जिवन जगणारा स्पष्टवक्ता माणूस आहे. तो तुम्हाला तोंडावर खर ते बोलतो. बाकी लोकांसारखं मागे बोलत नाही. तो त्याची नोकरी कायम रहावी म्हणून हांजी हांजी करणाऱ्यातला नाही.” असे पंडित यावेळी म्हणाले.
“काही वेळा समालोचन करताना तो अशा काही गोष्टी सांगतो त्या कदाचीत कुणाला आवडतही नाहीत. तो कुणाच्या विरुद्धही नाही. त्याला या पॅनेलमधून काढून टाकल्यावर मला कुणाला दोष द्यायचा नाही. परंतु मी बीसीसीआयला यावर पुन्हा विचार करण्याची विनंती करत आहे. समालोचकांनी सांगितलेल्या गोष्टी खुूुप महत्त्वाच्या असतात आणि त्यांचा युवा खेळाडूंना नक्कीच उपयोग होतो. “असेही ते पुढे म्हणाले.
महत्त्वाच्या घडामोडी-
–रोखठोक: …तरीही मांजरेकरांचे कौतुक करणं क्रमप्राप्त
–बरोबर १३ वर्षांपुर्वी १२७किलो वजनाच्या क्रिकेटपटूने घेतला होता उथप्पाचा नेत्रदिपक झेल, पहा व्हीडिओ
–टीम इंडियाचा शिलेदार कोरोना व्हायरस संपल्यावर पहिलं हे काम करणार
-इंग्लंडने उचलले मोठे पाऊल, क्रिकेटसाठी नक्कीच निराशाजनक गोष्ट
-कोरोनामुळे टी२० विश्वचषकावर परिणाम होणार? क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिले हे उत्तर