आयपीएल २०२२ स्पर्धेच्या मेगा ऑक्शन(Ipl mega auction) सोहळ्याला जोरदार सुरुवात झाली आहे. या मेगा ऑक्शनच्या पहिल्या दिवशी (१२ फेब्रुवारी ) अनेक खेळाडू कोट्यवधी झाले. आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच १० पेक्षा अधिक खेळाडूंवर १० कोटींची बोली लावण्यात आली. दरम्यान या लिलावात अशा दोन भावांच्या जोड्या होत्या, ज्यांनी कोट्यावधींची कमाई केली आहे.
चाहर बंधूंनी केली १९.२५ कोटींची कमाई
आयपीएल मेगा ऑक्शनचा पहिला दिवस, दोन भावांच्या जोडीसाठी खास ठरला. त्यापैकीच एक म्हणजे राहुल चाहर आणि दीपक चाहरची जोडी. गतवर्षी चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व केलेला दीपक चाहर यावेळी देखील चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे. आगामी हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्जने त्याला १४ कोटी रुपयांची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले आहे. तो आयपीएल स्पर्धेतील सर्वात महागडा भारतीय गोलंदाज ठरला आहे.
तसेच त्याचा बंधू राहुल चाहरला पंजाब किंग्ज संघाने ५.२५ कोटींची बोली आपल्या संघात स्थान दिले आहे. यासह चाहर बंधूंनी या लिलावाच्या पहिल्या दिवशी १९.२५ कोटींची कमाई केली आहे.
पंड्या बंधूंनी केली २३.२५ कोटींची कमाई
पंड्या बंधूंची जोडी ही आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक कमाई करणारी जोडी ठरली आहे. हार्दिक पंड्याला गुजरात टायटन्स संघाने १५ कोटी रुपयात रिटेन केले आहे. तर कृणाल पंड्याला लखनऊ सुपर जायंट्सने ८.२५ कोटी रुपयांची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले आहे. यासह पंड्या बंधूंनी या आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये २३.२५ कोटींची कमाई केली आहे.
चाहर आणि पंड्या बंधूंनी आयपीएल २०२२ स्पर्धेच्या मेगा ऑक्शनमध्ये ४२.५ कोटींची कमाई केली आहे. भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू याने आधीच भविष्यवाणी केली होती की, चाहर बंधू सर्वाधिक कमाई करणार. परंतु शेवटी पंड्या बंधूंनी बाजी मारली.
महत्वाच्या बातम्या:
पंजाब संघात दाखल झालेल्या शिखर धवनची आली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, ‘ट्रॉफी नक्कीच…’
धोनीबाबत सीएसकेच्या सीईओंचे मोठे विधान; म्हणाले, “तो संघ…”
IPL लिलावात लखनऊचा नवाबी अंदाज! आवेश खानवर लावली विक्रमी बोली, ठरला ऐतिहासिक खेळाडू