भारत आज, 3 जुलैला इंग्लंडविरुद्ध पहिला टी20 सामना खेळणार आहे. या सामन्यात जर अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या या दोघांनाही खेळण्याची संधी मिळाली तर त्यांची जोडी भारताकडून खेळणारी तिसरी भावांची जोडी ठरणार आहे.
याआधी भारताकडून मोहिंदर अमरनाथ – सुरिंदर अमरनाथ आणि युसुफ पठाण – इरफान पठाण या भावांच्या जोड्या खेळल्या आहेत.
इंग्लंडविरुद्धच्या 3 सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी कृणालची पहिल्यांदाच भारतीय संघात निवड झाली आहे. त्याला भारताच्या संघात दुखापतग्रस्त असणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरच्या ऐवजी संधी देण्यात आली आहे.
सुंदर उजव्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो इंग्लंड विरुद्धच्या टी20 आणि वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे.
जर आज कृणालला भारताच्या 11 जणांच्या संघात संधी मिळाली तर तो भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही पदार्पण करेल.
महत्त्वाच्या बातम्या:
–३ वेळा हुलकावणी दिलेला विक्रम करण्याची आज कोहलीला ‘विराट’ संधी
–टीम इंडियाच्या कर्णधार-उपकर्णधारांमध्ये आज या विक्रमासाठी टशन
–विराट, रोहितसह जगातील कोणत्याच दिग्गजाला जमलं नाही ते फिंचने आज करुन दाखवलं