---Advertisement---

उगाचच बिलियर्ड्सचा किंग म्हणत नाहीत! भारतीय पठ्ठ्याने मलेशियात पटकावले 25वे किताब, एकदा वाचाच

On: शनिवार, ऑक्टोबर 8, 2022 11:08 PM
Pankaj-Advani
---Advertisement---

क्रीडाविश्वातून भारतीयांची मान अभिमानाने उंचावणारी बातमी समोर येत आहे. जगभरात बिलियर्ड्सचा किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंकज आडवाणी याने शनिवारी (दि. 8 ऑक्टोबर) 25व्यांदा बिलियर्ड्स चॅम्पियनशिपचा किताब आपल्या नावावर केला आहे. अंतिम सामन्यात पंकजने भारताच्याच सौरव कोठारी याला 4-0ने पराभूत करत 25वेळा या प्रतिष्ठित किताबावर आपले नाव कोरले. या विजयानंतर पंकजने त्याच्या भावना व्यक्त केल्या.

पंकज आडवाणीच्या भावना
बिलियर्ड्स चॅम्पियनशिपचा 25व्यांदा किताब जिंकल्यानंतर 37 वर्षीय पंकज आडवाणी (Pankaj Advani) याने त्याच्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला की, “जागतिक चॅम्पियनशिपमध्ये आपले 25वे सुवर्णपदक आणि या हंगामात सलग पाचवे सुवर्णपदक जिंकण्याची भावना मी शब्दात मांडू शकत नाही. भारतीय होण्याचा अभिमान वाटत असल्याचे जाणवत आहे. जय हिंद.”

यादरम्यान पंकजने पहिल्या फ्रेमपासूनच आपला इरादा स्पष्ट केला होता की, तो सौरव कोठारी (Sourav Kothari) याला संधी देणार नाही. या 150हून अधिकच्या प्रकारात आडवाणीने पहिली फ्रेम 149च्या ब्रेकसोबत आपल्या नावावर केली. मात्र, तोपर्यंत सौरवने खातेही खोलले नव्हते. सौरवला त्याच्या पहिल्या आयबीएसएफ (आंतरराष्ट्रीय बिलियर्ड्स आणि स्नूकर महासंघ) जागतिक किताबाची प्रतीक्षा आहे.

या ‘बेस्ट ऑफ सेव्हन’च्या अंतिम सामन्यात आडवाणीने सुरुवातीपासूनच शानदार खेळ दाखवला होता. त्याने एका कॅलेंडर वर्षात बिलियर्ड्सचे राष्ट्रीय, आशियाई आणि जागतिक किताब जिंकण्याचा पाचव्यांदा अनोखा कीर्तीमान प्रस्थापित केला. सौरवला दुसऱ्या फ्रेममध्ये काही संधी मिळाल्या, पण त्याला त्याचा फायदा उचलता आला नाही. दुसरीकडे, पंकजने 77च्या ब्रेकच्या मदतीने 2-0ने आघाडी घेतली. यानंतर पंकजच्या खेळात आणखी सुधारणा पाहायला मिळाली आणि त्याने आपल्या कौशल्याने मलेशियाई प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकले.

पंकजने तिसऱ्या फ्रेममध्ये 153चा स्पर्धेतील सर्वोत्तम ब्रेक बनवला, ज्यामुळे तो किताबापासून केवळ एक फ्रेम दूर होता. त्याने चौथ्या प्रेममध्येही दाखवून दिले की, त्याला जगभरातील सर्वोत्तम खेळाडू का म्हणतात. त्याने 80 आणि 60चे दोन ब्रेक बनवून किताबावर आपले नाव कोरले. सौरवचे प्रदर्शन खूपच निराशाजनक राहिले. त्याला फक्त 72 गुण मिळवता आले. दुसरीकडे, पंकजने 600 पेक्षाही अधिक गुण मिळवत किताब जिंकला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ज्याच्या जीवावर खेळणार होते तोच बाहेर! आयर्लंडच्या प्रमुख गोलंदाजाची वर्ल्डकपमधून एक्झिट
चेंडू 110 मीटर गेला, तरीही टिम डेविडचे नाही भरले मन; म्हणाला, ‘पुढच्या वेळी…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---