---Advertisement---

“पंतमध्ये धोनीच्या नेतृत्वाची झलक दिसते”, माजी भारतीय खेळाडूची रिषभवर स्तुतीसुमने

On: शनिवार, मे 29, 2021 12:26 AM
---Advertisement---

सध्या भारतीय क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक मजबूत संघ म्हणून ओळखला जात आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वातील या संघाने मायदेशातच नव्हे तर, विदेशात देखील जाऊन विजय मिळवले असून, सर्व खेळाडू विजय योगदान देत आहेत. भारताचा युवा यष्टीरक्षक रिषभ पंत यादरम्यान संघाचा सर्वात मोठा मॅचविनर म्हणून पुढे आला. त्याने आपल्या फलंदाजीने सर्वांना खुश केले आहे. पंतने नुकतेच आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व केले आणि तो यामध्ये देखील यशस्वी ठरला. त्यानंतर आता एका माजी भारतीय यष्टीरक्षकाने पंतच्या नेतृत्वाची तुलना धोनीशी केली आहे.

त्याच्यामध्ये धोनीची झलक दिसते
भारतीय संघाचे माजी यष्टीरक्षक व माजी निवडकर्ता सबा करीम यांनी रिषभ पंतच्या भविष्यातील नेतृत्त्वाच्या संधीविषयी आपली मते मांडली. करीम म्हणाले, “माझ्यामते रिषभ भारताच्या भविष्यातील कर्णधार होईल का नाही याबाबत सांगणे आत्ताच उचित ठरणार नाही. मात्र, त्याच्या नेतृत्वाची वेगळी शैली आहे. तो वेगवेगळ्या पद्धतीने नेतृत्व करू शकतो नेतृत्व करू शकतो.”

करीम यांनी रिषभची तुलना भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीशी करताना म्हटले, “खेळाप्रती त्याचा एटीट्यूड एकदम चांगला आहे. जे खेळाडू त्याच्यासोबत खेळतात ते मजा घेतात. मला त्याच्यामध्ये धोनीची झलक दिसते. त्याचा एटीट्यूड व निर्णय घेण्याची क्षमता धोनीसारखी आहे.” यापूर्वी, पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बटने देखील त्याच्या नेतृत्वाचे कौतुक केले होते.

आयपीएलमध्ये केले नेतृत्व
रिषभ पंतने नुकताच स्थगित झालेल्या आयपीएल २०२१ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करताना संघाला आठ सामन्यानंतर अव्वल स्थानापर्यंत पोहचवले होते. श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाल्याने ऐनवेळी त्याला कर्णधार बनविण्यात आलेले. यापूर्वी, पंतच्या नेतृत्वात दिल्ली संघाने २०१८ मध्ये रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीपर्यंत धडक मारलेली.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘या’ कारणामुळे इंग्लंडचे फलंदाज अक्षर पटेलविरुद्ध ठरले अपयशी, फिरकीपटूनेच केला खुलासा

‘रियुनियन हे लहान मुलांचे होते, दिग्गज कायम एकत्रच असतात’, भारतीय दिग्गजाची मजेशीर पोस्ट

पत्नीसाठी तेलुगू कॅप्शनसह वॉर्नरने केला कार्टून फोटो पोस्ट; कँडिसकडून मिळाला ‘असा’ रिप्लाय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---