भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत हा आपल्या मजेशीर स्वभावासाठी नेहमीच चर्चेत असतो. मैदानावर काही वेळा संघसहकार्यांसोबत त्याचे चाललेले विनोदी संभाषण तर कधी विरुद्ध खेळाडूंसोबत चाललेली स्लेजिंग सोशल मीडियावर कायमच व्हायरल होत असते. इंग्लंड विरुद्धच्या चेन्नई कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी देखील पंतचे एक नवे रूप बघायला मिळाले. यावेळी पंत तालासुरात एक वाक्य बोलताना दिसला.
सामन्याच्या पहिल्या दिवशी जो रुट व डॉम सीबली फलंदाजी करत असताना भारताचा फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर त्यांना गोलंदाजी करत होता. यावेळी पंत काही मजेशीर कॉमेंट्स करत होता. स्टम्प माइक मध्ये आलेल्या आवाजानुसार पंत म्हणाल ,”मेरा नाम है वॉशिंग्टन मुझे जाना है डीसी.” पंतचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत असून, क्रिकेट फॅन्स देखील त्यावर मजेशीर कमेंट्स करत आहेत.
https://twitter.com/Souravpatel_17/status/1357641862316584960?s=08
दरम्यान सामन्याचा विचार केला असता पहिला दिवस गाजवला तो इंग्लंडचा कर्णधार जो रुटने. रुटने 197 चेंडूत 14 चौकार व एका षटकारासह 128 धावांची शानदार खेळी केली. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडने 89.3 षटकात 3 गडी गमावत 263 धावांपर्यंत मजल मारली आहे. दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर डॉम सिबली 87 धावा करून बाद झाला असला तरी, रुट अजूनही नाबाद असून सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याला झटपट बाद करण्याचे मोठे आव्हान भारतीय संघासमोर असणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
स्टार्क नाही ठरणार आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू, हे आहे कारण
Video : पंतने यष्ट्यांमागून गाजवला कसोटीचा पहिला दिवस, केले चाहत्यांचे मनोरंजन
शेतकरी आंदोलन: वातावरण तापलं! केरळमध्ये सचिन तेंडुलकरच्या पुतळ्यावर ओतला काळा रंग






