---Advertisement---

Video : पंतने यष्ट्यांमागून गाजवला कसोटीचा पहिला दिवस, केले चाहत्यांचे मनोरंजन

On: शुक्रवार, फेब्रुवारी 5, 2021 10:12 PM
---Advertisement---

चेन्नई येथे आजपासून (५ फेब्रुवारी) भारत आणि इंग्लंड संघामध्ये बहुचर्चित ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली. पाहुण्या इंग्लंडने शानदार फलंदाजी करत पहिला दिवस गाजवला. इंग्लंडने पहिल्या दिवशीच ३ बाद २६३ उभारल्या. इंग्लिश कर्णधार जो रूटचे शतक पहिल्या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले. मात्र, भारतीय यष्टीरक्षक रिषभ पंतने यष्ट्यांमागून चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले.

रिषभ पंतने वाढवला गोलंदाजांचा उत्साह

पहिल्या कसोटी सामन्यासाठी वृद्धिमान साहाआधी युवा रिषभ पंतला प्राधान्य देण्यात आले. त्यानंतर, रिषभने यष्टांमागून भारतीय गोलंदाजांना सूचना दिल्या तसेच चाहत्यांचे मनोरंजन केले. बीसीसीआयने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिओमध्ये रिषभ पंत वारंवार बोलताना दिसत आहे. पंत यष्ट्यांमागून प्रामुख्याने फिरकी गोलंदाजांना सूचना देत होता. या सूचना बऱ्याचदा विनोदी होत्या.

इंग्लंडच्या डावाच्या नवव्या षटकात अश्विन गोलंदाजी करताना पंतने म्हटले, “उधर से फसेगा तो मजा आयेगा.” त्यानंतर, “इधर से जायेगा तो दिक्कत पायेगा”, “यहा डालनाही नही”, असे अनेक शब्द वापरले. वॉशिंग्टन सुंदरची मजा घेताना त्याने म्हटले, “मेरा नाम है वॉशिंग्टन मुझे जाना है डीसी.” तसेच पंत अनेक खेळाडूंनाही क्षेत्ररक्षणासंबंधी सल्ले देताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

यष्ट्यांमागून मजा घेत असतो पंत

रिषभ पंत ला यापूर्वीही अशाप्रकारे यष्ट्यांमागून बोलताना पाहिले गेले आहेत. २०१८-२०१९ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याचे व ऑस्ट्रेलियन कर्णधार टिम पेनचे ‘बेबी सिटींग’ प्रकरण चांगलेच गाजले होते. आयपीएलमध्ये देखील तो अशा प्रकारे वारंवार बोलताना दिसतो.

रूटने दाखवा पहिल्या दिवशी दम

सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लिश कर्णधार जो रूटने आपल्या फलंदाजीचे कौशल्य संपूर्ण जगाला दाखवले. रुटने १९७ चेंडूत १४ चौकार व १ षटकारासह १२८ धावांची शानदार खेळी केली. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडने ८९.३ षटकात ३ गडी गमावत २६३ धावांपर्यंत मजल मारली आहे. दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर डॉम सिबली ८७ धावा करून बाद झाला असला तरी, रुट अजूनही नाबाद असून सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याला झटपट बाद करण्याचे मोठे आव्हान भारतीय संघासमोर असणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

शेतकरी आंदोलन: वातावरण तापलं! केरळमध्ये सचिन तेंडुलकरच्या पुतळ्यावर ओतला काळा रंग

आयपीएल २०२१ साठी केली इतक्या क्रिकेटपटूंनी नावनोंदणी

सध्या चर्चेत असलेल्या रिहानाचे ख्रिस गेलशी आहे खास नाते, जुना व्हिडिओ होतोय व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---