शुक्रवारपासून(१५ जानेवारी) ब्रिस्बेन येथील द गॅबा स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात चौथ्या आणि कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्याला सुरुवात झाली. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी रिषभ पंतबरोबर एक गमतीशीर घटना घडली. त्याची भारतीय संघातीलच कर्णधार आणि उपकर्णधार म्हणजेच अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्माने खिल्ली उडवली. या घटनेचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
झाले असे की प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाच्या डावातील ८४ वे षटक टी नटराजन टाकत होता, यावेळी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन युवा क्रिकेटपटू कॅमेरॉन ग्रीनसह फलंदाजी करत होता. या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवेळी पेन स्ट्राईकवर होता. त्याने नटराजनने टाकलेला चेंडू रक्षात्मक खेळायचा म्हणून बॅट फिरवली. मात्र, चेंडू बॅटला न लागताच जवळून यष्टीमागे उभ्या असलेल्या रिषभ पंतकडे गेला. त्यावेळी पंतला वाटले की चेंडू बॅटची कड घेऊन त्याच्याकडे आला आहे. त्यामुळे पंतने विकेटसाठी अपील केले.
मात्र, त्याच्या बाजूला स्लीपमध्ये उभ्या असलेल्या अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि रोहित शर्माने अपील केले नाही. त्यांना तो चेंडू बॅटला लागून न आल्याचे लक्षात आले. त्यामुळे एका क्षणी कसलीच पर्वा न करता पंत एकटाच अपील करत होता. पण त्याच्या जेव्हा काही वेळाने लक्षात आले की अपील केवळ आपण करतोय तेव्हा तो आजूबाजूच्या खेळाडूंकडे पाहू लागला. तेव्हा त्याला असे एकटेच अपील करताना पाहून रहाणे, पुजारा आणि रोहितला हसू आवरता आले नाही. यावेळी पंत झेल गेला असल्याचे रहाणे आणि रोहितला पटवताना दिसत होता तर रोहित पंतची मस्करी करतानाही दिसला. हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरत असून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Rishabh Pant was heaps keen on this one but he was getting donuts from the cordon! 😂 #AUSvIND pic.twitter.com/p4kHh536IZ
— cricket.com.au (@cricketcomau) January 15, 2021
या सामन्यात पहिल्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने ८७ षटकात ५ बाद २७४ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून टीम पेन (३८) आणि कॅमेरॉन ग्रीन (२८) नाबाद खेळत आहेत. तसेच मार्नस लॅब्यूशेनने १०८ धावांची शतकी खेळी केली आहे. तर मॅथ्यू वेडने ४५ धावा आणि स्टीव्ह स्मिथने ३६ धावांचे योगदान दिले आहे. मात्र ऑस्ट्रेलियाचे डेविड वॉर्नर(१) आणि मार्कस हॅरिस(५) हे सलामीवीर झटपट बाद झाले.
भारताकडून दिवसाखेर टी नटरजनने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तर शार्दुल ठाकून, वॉशि्ंग्टन सुंदर आणि मोहम्मद सिराज या तिघांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
पदार्पण करताच २१ वर्षीय वॉशिंग्टन सुंदर ‘या’ विक्रमासह इशांत शर्मा, रिषभ पंतच्या पंक्तीत सामील
संघसहकारी असावे तर असे! ‘या’ संघाकडून एकत्र खेळले अन् आता टीम इंडियाकडूनही मैदान गाजवण्यास सज्ज
अखेर तो क्षण आलाच! तब्बल ८९ वर्षांनंतर भारताला मिळाला ३०० कसोटीपटू, पाहा व्हिडिओ