पप्पू रॉय हे नाव जरी नवीन असले तरी आज तो स्थानिक क्रिकेटमध्ये स्वत:चे एक स्वतंत्र अस्तित्व तयार करत आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये यशस्वी कामगिरी केल्यावर त्याची देवधर ट्रॉफीमधील इंडीया सीमध्ये निवड झाली आहे.
फिरकीपटू असणाऱ्या या मुलाचे यश हे इतके प्रभावी आहे की तो संघाला निराश करणार नाही. 23 वर्षीय रॉयचे देवधर ट्रॉफीमधील इंडीया सीमध्ये निवड झाली आहे. या संघाचा कर्णधार अंजिक्य रहाणे आहे. त्याचे आयुष्य इतके खडतर आहे की, मम्मी पापा बोलण्याअगोदरच त्याचे पालक या जगात नव्हते.
ओडीसाकडून विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळल्यावर या स्पर्धेतील प्रत्येक विकेट ही रॉयसाठी महत्त्वाची होती. कारण यावरच त्याचे दोन वेळेचे जेवण अवलंबून होते.
“वरिष्ठ गटातील मुले मला बोलवतात आणि चेंडू टाकला तर तुला जेवण मिळेल. जर तू एक विकेट मिळवली तर तुला 10 रूपये मिळतील”, असे रॉय म्हणाला.
मुळचा बिहारचा असलेला रॉयने लहानपणीच त्याचा आई-वडीलांना गमावले आहे. वडील जामदार रॉय यांचे हृद्यविकाराने तर आई पार्वती रॉय यांचे जुन्या आजाराने निधन झाले आहे.
“आज जर ते दोघे असले असते तर त्यांना मी संघात खेळताना बघून खुप आंनद झाला असता. देवधर ट्रॉफीमध्ये निवड झाल्यावर मला संपूर्ण रात्र झोप लागली नाही. तर खूप रडू येत होते. पण आजपर्यंत केलेल्या मेहनतीचे आज चीज झाले”, असे भावनाविवश झालेला रॉय म्हणाला.
रॉयला त्याच्या आई-वडीलांनंतर त्याच्या काकाने सांभाळले. पण 15 वयवर्ष झाल्यावर त्याच्या काकाचेही निधन झाल्याने एक वेळेच्या जेवणाचेही हाल झाले होते. पण क्रिकेटने त्याचे संपूर्ण आयुष्य पालटले.
रॉयने हावडाच्या युनियन क्रिकेट अकादमीमधून प्रशिक्षक सुजित साहा यांच्या मार्गदर्शनाखाली सरावाला सुरूवात केली. त्यांनीच रॉयला डाव्या हाताने स्पिन गोलंदाजी करण्याचा सल्ला दिला.
रॉयने 2011मध्ये क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालच्या दुसऱ्या लीगमध्ये सर्वाधिक असे 50 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. त्याने डलहौसीकडून 9 सामन्यांमध्ये अशी कामगिरी केली. यावेळी तेव्हा आयरेश सक्सेना नंतर प्रग्यान ओझा हे दोघे बंगालकडून खेळत होते. पण रॉयला बंगाल संघात जागा मिळाली नाही.
कोलकातामधील क्रिकेट क्लब हे फक्त मोठ्या क्लबच्या क्रिकेटर्सचीच निवड करतात. यामुळे रॉयचे पुढचे लक्ष्य ओडीसा होते.
“माझा मित्र मुझकिर अली खान आणि असिफ इक्बाल खान यांनी मला जेवण आणि राहण्यास जागा दिली. त्यामुळेच ओडीसा हे माझे घर बनले आहे”, असे रॉय म्हणाला.
2015मध्ये रॉयला ओडीसाच्या 23 वर्षाखालील संघात जागा मिळाली. त्यानंतर तीन वर्षातच त्याची लिस्ट एच्या ओडीसाच्या वरिष्ठ गटात निवड झाली. ओडीसाकडून 9 लीग सामन्यांमध्ये 14 विकेट्स घेतल्याने त्याची निवड करण्यात आली होती.
20 सप्टेंबरलाच आंध्र विरुद्ध रॉयला पदार्पण करण्याची संधी होती. यावेळी त्याने भारतीय कसोटी खेळाडू हनुमा विहारी आणि माजी 19 वर्षाखालील संघाचा कर्णधार रिकी भुई या दोघांना बाद केले होते.
आता त्याला भारतीय संघाकडून खेळण्याची इच्छा आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–दुसऱ्या वनडेतही कोहली ठरणार किंग, आरामात करणार हे ३ विक्रम आपल्या नावावर
–वयाच्या १५ वर्षी सचिनने जी ड्रेसिंगरुम शेअर केली तिथे ३० वर्षांनी करणार ही गोष्ट