पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये मेन्स क्लब थ्रो स्पर्धा भारतासाठी खूपच प्रेक्षणीय होती. धरमबीर आणि प्रणव सुरमा यांनी चमत्कार करत भारतासाठी एकाच स्पर्धेत दोन पदके जिंकले आहेत. क्लब थ्रो F51 च्या फायनलमध्ये धरमबीरने भारतासाठी सुवर्णपदक, तर प्रणव सूरमाने रौप्यपदक पटकावले आहे. बुधवारी (04 सप्टेंबर) रात्री उशिरा हा सामना झाला. या स्पर्धेत सर्बियाच्या जेल्को दिमित्रीजेविकने कांस्यपदक पटकावले. दरम्यान आता या दोघांच्या सहाय्याने भारताचे हे 23 आणि 24 क्रमांकाचे पदक ठरले आहे. म्हणजेच पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत 24 पदके जिंकली आहेत.
धर्मबीरने अंतिम सामन्यात पहिले चार थ्रो फाऊल केले. त्यानंतर पाचव्या थ्रोने त्याने 34.92 अंतर गाठले आणि हा त्याचा सर्वोत्तम थ्रो होता, ज्यामुळे त्याने सुवर्ण जिंकले. यानंतर धरमबीरने सहाव्या थ्रोमध्ये 31.59 मीटर अंतर पूर्ण केले. अशाप्रकारे पहिले चार थ्रो फाऊल करूनही धरमबीरने सुवर्णपदकावर कब्जा केला.
दुसरीकडे प्रणव सुरमाने पहिल्याच थ्रोमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली. त्याचा पहिला थ्रो 34.59 होता. ज्यामुळे त्याला रौप्य पदक मिळाले. त्यानंतर दुसऱ्या थ्रोमध्ये त्याने 34.19 चा गुण नोंदवला आणि तिसरा थ्रो फाऊल होता. यानंतर त्याने चौथ्या थ्रोमध्ये 34.50, पाचव्या थ्रोमध्ये 33.90 आणि सहाव्या थ्रोमध्ये 33.70 असे अंतर पूर्ण केले. तर तिसऱ्या स्थानीसाठी सर्बियाच्या जेल्को दिमित्रीजेविकने 34.18 फेकसह कांस्यपदक जिंकले. यासोबत स्पर्धेत सहभागी होणारा तिसरा भारतीय अमित कुमार पदक जिंकू शकला नाही. तो केवळ 23.96 असा सर्वोत्तम थ्रो करू शकला. या थ्रोसह अमित कुमार या स्पर्धेत 10व्या स्थानावर राहिला. त्याच वेळी
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये सातव्या दिवशी भारताच्या खात्यात एकूण 4 पदके आली असून आता एकूण पदकांची संख्या 24 झाली आहे. सातव्या दिवशी जिंकलेल्या 4 पदकांमध्ये 2 सुवर्ण आणि 2 रौप्य पदकांचा समावेश आहे. तिरंदाजीच्या पुरुष रिकर्व्ह आणि पुरुष क्लब थ्रो F51 मध्ये सुवर्ण तर पुरुष क्लब थ्रो F51 आणि शॉटपुट F46 मध्ये भारताने रौप्य पदके जिंकली.
हेही वाचा-
तिरंदाजीमध्ये देखील सुवर्णपदक; पॅरालिम्पिकमध्ये भारताला घवघवीत यश
उद्यापासून रंगणार दुलीप ट्राॅफीचा थरार, कधी आणि कुठे पाहायचे लाइव्ह सामने
कोहलीपासून धोनीपर्यंत कोणी भरला सर्वाधिक कर, ‘या’ दिग्गजाने भरले 66 कोटी रूपये