भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर पार पडला होता. हा सामना अनिर्णीत राहिला होता. तर दुसरा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ३ डिसेंबरपासून खेळला जाणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि ईशांत शर्मा हे दिग्गज खेळाडू पूर्णपणे फ्लॉप ठरले होते. आता दुसरा कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे यांनी या तिघांचा बचाव करत मोठे वक्तव्य केले आहे.
ईशांत शर्मा हा भारतीय संघातील सर्वात अनुभवी गोलंदाज आहे. त्याने १०० पेक्षा अधिक कसोटी सामने खेळले आहेत. तो इंग्लंड दौऱ्यावर आणि कानपूरमध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात फ्लॉप ठरला होता. याबाबत बोलताना पारस म्हाम्ब्रे म्हणाले की, “बरेच दिवस झाले ईशांतने कसोटी क्रिकेट खेळलेले नाहीये. तो आयपीएल स्पर्धा खेळत नाही. तसेच टी२० विश्वचषक स्पर्धा देखील खेळला नाही. या विश्रांतीचा परिणाम त्याच्या कामगिरीवर दिसून आला आहे.” त्याने गेल्या ४ कसोटी सामन्यात १०९.२ षटक गोलंदाजी केली आहे. यादरम्यान त्याला ८ गडी बाद करण्यात यश आले होते.
आयपीएल २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात ईशांत शर्माला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्यानंतर झालेल्या टी२० विश्वचषक स्पर्धेत देखील त्याला स्थान देण्यात आले नव्हते. याबाबत बोलताना पारस म्हाम्ब्रे म्हणाले की, “आम्हाला खात्री आहे की, काही सामन्यानंतर तो पुन्हा एकदा फॉर्ममध्ये येईल. ईशांत शर्माकडे भरपूर अनुभव आहे. तो ड्रेसिंग रूममध्ये असण्याचा खेळाडूंवर चांगला परिणाम होतो. युवा वेगवान गोलंदाज त्याच्याकडून बारीक सारीक गोष्टी शिकू शकतात.”
तसेच अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराबाबत बोलताना पारस म्हाम्ब्रे म्हणाले की, “त्यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे आणि ते भरपूर क्रिकेट खेळले आहेत. एक संघ म्हणून, आम्हाला माहित आहे की त्यांना ट्रॅकवर परत येण्यासाठी एका चांगल्या खेळीची गरज आहे. आम्ही सर्व त्यांच्यासोबत आहोत.”
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबईचा अभिमान पोलार्ड तात्या! अवघ्या ६ कोटीत मान्य केले रिटेंशन
अल्टिमेट कराटे लीगमध्ये पुणे डिव्हाईनचा संघ ‘विनिंग किक’ मारून विजेतेपद पटवण्यासाठी सज्ज