सध्या संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे सुरू असलेल्या टी२० विश्वचषकानंतर भारतीय क्रिकेटमध्ये अनेक बदल होणार आहेत. भारताचा कर्णधार विराट कोहली याने टी२० संघाचे नेतृत्व सोडण्याची घोषणा केली असून, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण व क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर हे देखील भारतीय संघापासून वेगळे होणार आहेत. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या सर्व जागांसाठी अर्ज मागविले असून, त्याला चांगलाच प्रतिसाद भेटत आहे. आता भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक होण्यासाठी सध्या भारत अ संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक असलेले पारस म्हांब्रे हेदेखील इच्छुक असून, त्यांनी यासाठी अर्ज केला आहे.
बीसीसीआय सुत्रांकडून दिली माहिती
बीसीसीआयच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पारस म्हांब्रे यांनी भारताच्या वरिष्ठ संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षक पदासाठी सोमवारी अर्ज केला. पारस यांना राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालक व रवी शास्त्री यांच्या नंतर भारताचे मुख्य प्रशिक्षक होण्याच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या राहुल द्रविड यांचे निकटवर्तीय मानले जाते. हे दोघे मागील जवळपास सहा वर्षापासून एकत्रित काम करत आहेत. त्यामुळे, द्रविड यांची मुख्य प्रशिक्षणपदी वर्णी लागल्यास पारस हे भारताचे पुढील गोलंदाजी प्रशिक्षक बनू शकतात. या पदासाठी अर्ज करण्याची अखेरची तारीख २६ ऑक्टोबर आहे.
असा राहिला आहे कार्यकाळ
सध्या ४९ वर्षाच्या असलेल्या पारस यांनी १९९६ ते १९९८ दरम्यान भारतासाठी दोन कसोटी आणि तीन वनडे सामने खेळले आहेत. त्यांनी मुंबईसाठी ९१ प्रथमश्रेणी सामने खेळले असून, त्यांच्या नावावर २८४ बळी आहेत. त्यांनी १३ वेळा पाच बळी मिळवले होते. रणजी ट्रॉफीमध्ये बंगाल आणि बडोदा संघाचे प्रशिक्षक राहिले आहेत. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सामील होण्यापूर्वी काही काळ ते मुंबई इंडियन्सच्या संघाचाही भाग होते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली भारताच्या युवा संघाने २०१८ मध्ये एकोणीस वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक जिंकला होता.
अभय शर्मा होत असतात क्षेत्ररक्षण प्रशिक्षक
पारस यांच्याप्रमाणेच भारत अ संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक असलेल्या अभय शर्मा यांनी देखील मुख्य संघाच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षक पदासाठी अर्ज केला आहे. तेदेखील द्रविड यांचे जवळचे मानले जात असल्याने, ही तिकडी भारताच्या वरिष्ठ संघाला मार्गदर्शन करताना दिसल्यास आश्चर्य वाटायला नको.
महत्त्वाच्या बातम्या-
सबका बदला लेगा माही! आयपीएलमध्ये रंगणार चेन्नई विरुद्ध लखनौचे नवे द्वंद; ‘हे’ आहे कारण
अफगानी फलंदाजाचा हुबेहूब धोनी स्टाईल हेलिकॉप्टर शॉट, इंग्लंडची महिला क्रिकेटरही चकित- व्हिडिओ