प्रो कबड्डीत काल (२० सप्टेंबर) तेलुगू टायटन्स विरुद्ध पटना पायरेट्स यांच्यात सामना रंगला. अतिशय अटीतटीचा हा सामना बरोबरीत सुटला. या सामन्यात पटनाचा पराभव टाळण्यात परदीप नरवालची महत्वाची भूमिका होती. परदीप नरवालने या सामन्यात १७ रेड गुण मिळवत ७ व्या मोसमात २०० रेड पॉइंट्सचा पल्ला पार केला.
त्याने प्रो कबड्डीच्या ७ व्यामोसमात २०० रेड पॉइंट्स पूर्ण करत आणखी एक विश्वविक्रम आपल्या नावावर केला. तो प्रो कबड्डीच्या सलग तीन मोसमात २०० रेड पॉइंट्स पूर्ण करण्याची कामगिरी करणारा तो पहिलाच खेळाडु ठरला आहे.
त्याने ५ व्या मोसमात २६ सामन्यांत ३६९ रेड पॉइंट्स मिळवले होते तर ६व्या मोसमात २१ सामन्यांत २३३ रेड पॉइंट्स मिळवले होते. ७ व्या मोसमात त्याचे आतापर्यंत १७ सामन्यांत २०७ रेड गुण आहेत.
त्यामुळे सलग तीन मोसमामध्ये अशी कामगिरी करणारा परदीप एकमेव खेळाडु आहे. परदीपने आतापर्यंत १०२ सामन्यांत १०६५ रेड पॉईंट्स सह ५५ सुपर टेन केले आहेत. तर सर्वाधिक ४८ सुपर रेड आहेत.
परदीपचे प्रो कबड्डीत मागील सलग तीन मोसमातील रेड पॉइंट्स :
३६९ रेड पॉइंट्स (मोसम ५)
२३३ रेड पॉइंट्स (मोसम ६)
२०७* रेड पॉइंट्स (मोसम ७)
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–मुंबई शहर “पंच उजळणी शिबिर” रविवारी रायगड जिल्ह्यात
–पुणेरी पलटनच्या खेळाडूंनी चाहत्यांच्या घरी भेट देत त्यांना केले अचंबित