प्रो कबड्डीत कोणालाही न जमलेला ‘तो’ विक्रम परदीप नरवालने करुन दाखवला!

पुणे| प्रो कबड्डीत काल (१५ सप्टेंबर) पुणेरी पलटण विरुद्ध पटना पायरेट्स यांच्यात सामना रंगला. या सामन्यात पटना पायरेट्सने ५५-३३ असा दणदणीत विजय मिळवला. पटनाच्या विजयात कर्णधार परदीप नारवालची महत्वाची भूमिका होती. परदीप नरवालने यासामन्यात १८ रेड गुण मिळवत सीजन ७ मधला १० वा सुपर टेन पूर्ण केला.

प्रो कबड्डी सीजन ७ मध्ये १० सुपर टेन पूर्ण करत परदीपने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला. सलग तीन सीजन मध्ये १० किंवा त्यापेक्षा जास्त सुपर टेन पूर्ण करण्याची कामगिरी प्रदीपने केली आहे.

प्रो कबड्डीत सीजन ५ मध्ये परदीपच्या नावावर २६ सामन्यांत १९ सुपर टेन होते तर सीजन ६ मध्ये २५ सामन्यांत १५ सुपर टेन त्याने केले होते. सीजन ७ मध्ये आतापर्यंत त्याने १६ सामन्यांत १० सुपर टेन पूर्ण केले आहेत. सलग तीन सीजन मध्ये अशी कामगिरी करणारा परदीप एकमेव खेळाडु आहे.

परदीपने आतापर्यंत १०१ सामन्यांत १०४८ रेड पॉईंट्स सह ५४ सुपर टेन केले आहेत. परदीपचे सरासरी १०.३७ गुण आहेत.

परदीप नरवालचे प्रो कबड्डीत मागील सलग तीन सीजनमधील एकूण सुपर टेन:

१९ सुपर टेन (सीजन ५)

१५ सुपर टेन (सीजन ६)

१० सुपर टेन (सीजन ७)

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

घरच्या मैदानावर खेळायला सुरुवात करण्यापूर्वी पुणेरी पलटणने घेतला बाप्पाचा आशीर्वाद

प्रो कबड्डीत अशी कामगिरी करणारा गिरिश एर्नाक पहिला महाराष्ट्रीयन खेळाडू

‘एक हजारी मनसबदार’ परदीप नरवालने प्रो कबड्डीत रचला मोठा इतिहास

You might also like

Leave A Reply