---Advertisement---

घरच्या मैदानावर खेळायला सुरुवात करण्यापूर्वी पुणेरी पलटणने घेतला बाप्पाचा आशीर्वाद

On: शुक्रवार, सप्टेंबर 13, 2019 8:14 PM
---Advertisement---

पुणे। पुणेरी पलटण विवो प्रो कबड्डी लीगमधली पुण्याची टीम आहे. या टीमने पुण्याच्या मानाच्या पहिल्या गणपतीचे – कसबा गणपतीचे दर्शन घेतले आणि येत्या पुणे लीगच्या मॅचसाठी बाप्पाचा आशीर्वाद घेतला. यावेळी अतिशय उत्साहात प्रमुख प्रशिक्षक अनुप कुमार आपल्या टीमबरोबर गणपती मंडळाला भेट देऊन आशीर्वाद घेतले. खेळाडूंनी मंदिरात आरती केली आणि उपस्थित भक्तांना प्रसादही वाटला.

कसबा गणपती ट्रस्टतर्फे खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. मंडळात जमलेल्या भक्तांना त्यांच्या लाडक्या खेळाडूंना यावेळी पाहता आले. प्रार्थना झाल्यानंतर, काही उत्साही चाहत्यांनी आपल्या लाडक्या खेळाडूंबरोबर सेल्फी काढले, तसेच त्यांच्या सह्याही घेतल्या.

घरच्या मैदानावर सुरू होणाऱ्या मॅचेससाठी टीमने बाप्पाचे दर्शन घेतले आणि टीम नवीन उत्साहात, जोशात कामगिरीसाठी सज्ज झाली आहे. लवकरच सुरू होणाऱ्या मॅचेससाठी पुणेरी पलटणने आपल्या चाहत्यांसाठी थरारक खेळ खेळण्याचे वचन दिले आहे. पुढील सलग सहा दिवस कबड्डीचा थरार त्यांना अनुभवता येणार आहे. पुणेरी पलटणच्या घरच्या मैदानावर शनिवार १४ सप्टेंबर पासून खेळाला सुरुवात होत आहे. पहिली मॅच गुजरात फॉर्च्युन जायंट्सबरोबर होईल.

अनुप कुमार पुण्याच्या टीमचे प्रमुख प्रशिक्षक आहेत आणि सुरजित सिंगच्या नेतृत्वाखाली टीम खेळत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment