खेळाचे चाहते पॅरिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक 2024 च्या अतुरतेने वाट पाहत आहेत. खेळाच्या या महाकुंभाला 26 जुलै पासुन सुरुवात होणार आहे. भारताने याआधी 2020 मध्ये टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले होते. जो स्टार भालाफेक नीरज चोप्राच्या खात्यात आले होते. पण यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताला जास्तीत जास्त सुवर्ण पदक मिळण्याची अपेक्षा आहे. सुवर्ण पदक कोणत्याही खेळाडू व देशासाठी खूप महत्तवाचा असतो. तर खेळाडूंना देण्यात येणार सुवर्ण पदक पूर्ण सोन्याचे असते का? चला तर जाणून घेऊया सुवर्ण पदकाचे नेमक रहस्य काय आहे.
सर्वप्रथम आम्ही सांगू इच्छितो की. सुवर्ण पदक पूर्णपणे सोन्याने तयार झालेले नसते. परंतु या पदकात सोन्याचे अंश असते. संपुर्ण पदक चांदीचे असते. ज्यावर सोन्याने पाॅलिश केलेले असते. 1912 मध्ये स्टॉकहोम गेम्समध्ये ऑलिम्पिकमध्ये अंतिम सुवर्णपदके देण्यात आली होती. यानंतर फक्त गोल्ड पॉलिश मेडल्स दिली जातात. तथापि, एखाद्या खेळाडूसाठी पदकाचे मूल्य अनमोल असते कारण ते मिळवण्यासाठी खेळाडू दिवसरात्र मेहनत करत असतात.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने सर्व पदकांसाठी नियम केले आहेत. समितीच्या नियमानुसार सुवर्णपदकामध्ये किमान 6 ग्रॅम सोने असावे. उर्वरित पदक चांदीचे आहे. याशिवाय, पदकाचा व्यास किमान 60 मिमी आणि जाडी 3 मिमी असावी. सुवर्णपदकाचे वजन सुमारे अर्धा किलो आहे.
सोन्याव्यतिरिक्त, रौप्य पदक पूर्णपणे चांदीचे बनलेले आहे. या पदकाचे वजनही सुमारे अर्धा किलो आहे. कांस्यपदक हे इतर दोन पदकांपेक्षा हलके आहे. हे पदक प्रामुख्याने तांब्यापासून बनविलेले आहे ज्यामध्ये काही जस्त देखील समाविष्ट आहे. या पदकाचे वजन अर्धा किलोपेक्षा 50 ग्रॅम कमी असते.
महत्तवाच्या बातम्या-
ऑलिम्पिकमध्ये फक्त 5 रिंग का असतात? रिंगच्या रंगांचा अर्थ काय? सर्वकाही जाणून घ्या
अभिषेक शर्मा समोर सर्वजण फेल, पदार्पणाच्या टी20 मालिकेतच केला महान विक्रम, ठरला भारताचा पहिला खेळाडू
कपिल देव यांचे प्रयत्न फळाला! कॅन्सरशी लढा देत असलेल्या माजी क्रिकेटपटूला बीसीसीआयकडून तातडीनं मदतीची घोषणा