---Advertisement---

‘ट्रान्सजेंडर’ इमान खलीफनं जिंकलं सुवर्णपदक; महिला असण्याबद्दल झाले होते प्रश्न उपस्थित

On: शनिवार, ऑगस्ट 10, 2024 11:41 AM
---Advertisement---

अल्जेरियन महिला बॉक्सर इमाने खलीफने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. काल (09 ऑगस्ट) शुक्रवारी इमान खलिफाने महिलांच्या 66 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. अल्जेरियाच्या महिला बॉक्सर लिंग विवादामुळे खूप चर्चेत होत्या. इमान खलिफावर तर बायोलॉजिकल मॅच असल्याचा आरोपही करण्यात आला होता. चीनच्या यांग लिऊविरुद्धच्या लढतीत इमानने सुवर्णपदक जिंकले.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचा विश्वास होता की तिने त्यांच्या मानकांची पूर्तता केली, ज्यामुळे तिला स्पर्धेत भाग घेण्याची परवानगी देण्यात आली. इमानने अखेर सुवर्णपदक जिंकले. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या सामन्यांमध्ये सहभागी झालेल्या विविध देशांच्या महिला बॉक्सर्सनी इमानविरोधात तक्रार केले होते.

इमान खलिफाने राऊंड ऑफ-16 वा सामना इटालियन बॉक्सर अँजेला कारिनीविरुद्ध खेळला. इटालियन बॉक्सरने इमान खलिफासमोर काही सेकंदातच लढत सोडून दिली होती आणि ती रिंगमधून बाहेर पडली होती. यानंतर इमान खलिफाने अंतिम फेरीपर्यंत तिचे सर्व सामने एकतर्फी जिंकले.

उपांत्यपूर्व फेरीत इमान खलिफाचा सामना हंगेरीच्या लुका ॲना हमारीशी झाला. या सामन्यात इमान खलिफाने 5-0 असा विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली. त्यानंतर उपांत्य फेरीत अल्जेरियन बॉक्सरने थायलंडच्या जँजेम सुवानाफेंगचा 5-0 असा पराभव केला.

उपांत्य फेरीत शानदार विजयाची नोंद करणाऱ्या इमान खलिफाने अंतिम फेरीतही एकतर्फी विजय मिळवला. सुवर्णपदकासाठी खेळल्या गेलेल्या अंतिम फेरीत इमानने चीनच्या यांग लिऊचा 5-0 असा पराभव केला. अशाप्रकारे तिने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये वादांच्या भोवऱ्यात सुवर्णपदक जिंकले. असे म्हणले तर वावगे ठरणार नाही.

हेही वाचा-

Paris Olympics: भारतासाठी आज 7 वे पदक निश्चित होणार? जाणून घ्या दिवसभराचे वेळापत्रक
“जिममध्ये रात्रभर जॉगिंग केलं…”, कांस्यपदक सामन्यापूर्वी अमनने चक्क इतके किलो वजन घटवले
वयाच्या 10 व्या वर्षी अनाथ, स्टेडियमच घर! पाहा अमन सेहरावताचा ऑलिम्पिक पदकाचा संघर्षमयी प्रवास

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---