पॅरिस ऑलिम्पिकमधील टीम इंडियाला सहावे पदक मिळाले आहे. पैलावान अमन सेहरावतने कुस्तीमध्ये कांस्यपदक जिंकले आहे. त्याने पुरुषांच्या 57 किलो वजनी गटात पोर्तो रिकोच्या कुस्तीपटूला 13-5 अशा मोठ्या फरकाने पराभूत करून भारताचा झेंडा फडकवला. भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत एक रौप्य आणि 5 कांस्य अशी एकूण 6 पदके जिंकली आहेत. 2024 च्या ऑलिम्पिक गेम्समध्ये भारतीय दलात सामील झालेला अमन हा एकमेव पुरुष कुस्तीपटू आहे. ज्याने ऑलिम्पिक पदार्पणातच कांस्य पदक जिंकून इतिहास रचला आहे.
पोर्तो रिकोच्या कुस्तीपटूने कांस्यपदकाच्या लढतीत सुरुवातीची आघाडी घेतली होती, नंतर अमन सेहरावतने जोरदार पुनरागमन केले. पहिल्या फेरीअखेर भारतीय कुस्तीपटू 4-3 ने आघाडीवर होता. अमनने दुसऱ्या फेरीत एकतर्फी खेळ दाखवत प्रतिस्पर्ध्याला गुडघ्यापर्यंत आणण्यात यश मिळवले. शेवटी 21 वर्षीय अमन सेहरावतने 13-5 अशा फरकाने सामना जिंकला.
2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकपासून भारत प्रत्येक वेळी कुस्तीमध्ये ऑलिम्पिक पदके जिंकत आला आहे. 2008 मध्ये सुशील कुमारने कांस्यपदक जिंकून इतिहास रचला होता. त्यानंतर सुशीलने 2012 मध्ये सिल्वर आणि त्याच वर्षी योगेश्वर दत्तने कांस्यपदक जिंकले. 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये, साक्षी मलिकने कांस्यपदक जिंकले आणि ऑलिम्पिक खेळांमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू देखील ठरली. 2020 मध्ये रवी दहिया आणि बजरंग पुनिया आणि आता अमन सेहरावत यांनी हा वारसा कायम ठेवला आहे.
2008 बीजिंग ऑलिम्पिक – सुशील कुमार (कांस्य)
2012 लंडन ऑलिम्पिक – सुशील कुमार (रौप्य), योगेश्वर दत्त (कांस्य)
2016 रिओ ऑलिम्पिक – साक्षी मलिक (कांस्य)
2020 टोकियो ऑलिम्पिक – रवी दहिया (रौप्य), बजरंग पुनिया (कांस्य)
2024 पॅरिस ऑलिम्पिक – अमन सेहरावत (कांस्य)
पदक जिंकल्यानंतर अमन सेहरावतने आपला ऐतिहासिक विजय त्याच्या आई वडिलांना समर्पित केला आहे. तो म्हणाला की, आपला विजय त्याच्या पालकांना आणि संपूर्ण देशवासीयांना समर्पित आहे. खर तर, अमन फक्त 21 वर्षांचा आहे आणि त्याच्या पहिल्या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणे ही त्याच्यासाठी, त्याच्या कुटुंबासाठी आणि सर्व देशवासियांसाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे.
हेही वाचा-
बाबरनं केलं सुवर्णपदक विजेत्या अर्शदचं अभिनंदन…! तरीही चाहत्यांनी केलं प्रचंड ट्रोल
“तोही माझ्या मुलासारखाच आहे” पाकिस्तानच्या अर्शदच्या आईनं निरज चोप्राला दिला खास संदेश
सुवर्णपदक जिंकताच अर्शदवर पैशांचा पाऊस, पाकिस्तानने जाहीर केले चक्क इतक्या कोटी रकमेचे बक्षीस