पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये अनेक घटना ऐकायला मिळत आहेत. दरम्यान तिसऱ्या दिवशी, तलवारबाजीचा राऊंड ऑफ 32 सामना खेळला गेला. ज्यामध्ये इजिप्त आणि युनायटेड स्टेट्सच्या महिला तलवारबाजपटू आमने-सामने होते. हा सामना इजिप्तच्या तलवारबाजपटूने जिंकला. यानंतर राऊंड ऑफ 16 मध्ये इजिप्त आणि दक्षिण कोरिया यांच्यात सामना झाला. मात्र या सामन्यात इजिप्तच्या तलवारबाजपटूला पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर, इजिप्शियन नदा हाफिजच्या इंस्टाग्राम पोस्टने जग हदरले आहे.
महिलांच्या वैयक्तिक तलवारबाजीध्ये टेबल 16 मध्ये दक्षिण कोरियाच्या खेळाडूला हरवल्यानंतर नादा हाफिझने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे तिने मोठा खुलासा केली आहे. तिने सांगितले की ती सात महिन्यांची गरोदर आहे. सामन्याच्या काही तासांनंतर, नादाने इंस्टाग्रामवर पोस्ट केले, “7 महिन्यांची गर्भवती ऑलिम्पियन! तुम्ही व्यासपीठावर पाहिलेले दोन खेळाडू प्रत्यक्षात तीन होते! मी, माझा प्रतिस्पर्धी आणि माझी भावी लहान मुलगी!”
View this post on Instagram
नादा हाफिजने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे- “माझ्या बाळाने आणि मी शारीरिक आणि भावनिक अशा दोन्ही आव्हानांना तोंड दिले. गर्भधारणेचा रोलरकोस्टर स्वतःच कठीण आहे, परंतु जीवन आणि खेळ यांच्यातील संतुलन राखण्याची लढाई अत्यंत कठीण होती, परंतु हे सर्व फायदेशीर ठरले.”
नादा हाफिजने तिचे पती आणि कुटुंबाचे आभार मानले, ज्यांनी तिला पूर्ण पाठिंबा दिला. नादा तिच्या पोस्टमध्ये लिहिते – “मी हे सांगण्यासाठी ही पोस्ट लिहित आहे की मला शेवटच्या 16 मध्ये माझे स्थान मिळाले याचा मला अभिमान आहे. मी नशीबवान आहे की मला माझ्या पती आणि माझ्या कुटुंबाचा विश्वास मिळाला, ज्यामुळे मी हे करू शकले.
नादा हाफिजने तिच्या पहिल्या सामन्यात अमेरिकेच्या एलिझाबेथ टार्टाकोव्स्कीचा 15-13 असा पराभव केला. पण दुसऱ्या सामन्यात तिला कोरियाच्या जिओन ह्योंगकडून 7-15 असा पराभव पत्करावा लागला. नाडाची ही तिसरी ऑलिम्पिक स्पर्धा होती.
हेही वाचा-
परवानगीशिवाय फोटो वापरला, मनू भाकर या दोन नामंकित ब्रँड्सवर कायदेशीर कारवाई करणार
रिंकू सिंह, रियान पराग की रवी बिश्नोई…,श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत कोणी जिंकलं ‘बेस्ट फिल्डर’ मेडल?
सूर्यकुमार यादवनं कर्णधार म्हणून रोहित शर्माचा विक्रम मोडला, आता फक्त विराट कोहलीच पुढे!