---Advertisement---

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, ‘विनेश फोगट’ला मिळणार या सर्व सुविधा, जाणून घ्या

On: गुरूवार, ऑगस्ट 8, 2024 1:08 PM
---Advertisement---

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटला मोठा धक्का बसला आहे. विनेश फोगटने अंतिम फेरी गाठली, पण पदक जिंकण्यात मात्र तिला अपयश आले. वास्तविक, विनेशने 50 किलो गटात भाग घेतली होती, परंतु तिच्या वजनात केवळ 100 ग्रॅम जास्त भरले, त्यानंतर तिला फायनल सामन्यापूर्वीच अपात्र ठरवण्यात आले. या निर्णयाने हैराण झालेल्या विनेश फोगटने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली. विनेश फोगटच्या निवृत्तीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. मात्र, या दरम्यान, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांनी एक मोठी घोषणा केली आहे.

हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांनी सांगितले की, विनेश फोगट जरी फायनल खेळू शकली नसली तरी तिला रौप्य पदक विजेत्याला बक्षीसासह सर्व सुविधा दिल्या जातील. त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे की, काही कारणांमुळे ती ऑलिम्पिकची अंतिम फेरी खेळू शकली नसली तरी ती आपल्या सर्वांसाठी चॅम्पियन आहे.

हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांनी पुढे लिहिले की, आमच्या सरकारने ठरवले आहे की विनेश फोगटचे पदक विजेत्याप्रमाणे स्वागत आणि सत्कार करण्यात येईल. ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्याला हरियाणा सरकार जे सर्व सन्मान, बक्षिसे आणि सुविधा देते ते विनेश फोगटला देखील कृतज्ञतेने दिले जातील, आम्हाला विनेश तुझा अभिमान आहे.

हेही वाचा-

पॅरिस ऑलिम्पिक वादाच्या भोवऱ्यात; शिस्तभंग केल्याप्रकरणी भारतीय खेळाडूंची हकालपट्टी
“तू हरली नाहीस.. तूला हरवलं..”, विनेश फोगटच्या निवृत्तीनंतर बजरंग पुनियाचे मोठे वक्तव्य
भारतासह महाराष्ट्राचं स्वप्न भंगलं; मराठमोळ्या अविनाश साबळेची झुंज अपयशी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---