पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या दुसऱ्या दिवशी (28 जुलै) नेमबाज मनू भाकरनं भारतासाठी पहिलं पदक मिळवलं. तिनं कांस्य पदकावर निशाणा साधला आहे. यासह भारतानं पदकतालिकेत एंट्री केली. या बातमीद्वारे पॅरिस ऑलिम्पिकच्या आतापर्यंतच्या पदकतालिके बद्दल जाणून घेऊया.
दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस जपान 4 सुवर्ण आणि एकूण 7 पदकांसह पदकतालिकेत अव्वल स्थानावर आहे. अमेरिकेनं एकूण 12 पदकं जिंकली आहेत. मात्र त्यांना केवळ 3 सुवर्ण पदकं जिंकता आली असल्यामुळे संघ तिसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया 4 सुवर्ण आणि एकूण 6 पदकांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. फ्रान्स आणि दक्षिण कोरियानं 3-3 सुवर्ण पदकं जिंकली आहेत. ते अनुक्रमे चौथ्या (एकूण 8 पदक) आणि पाचव्या (एकूण 6 पदक) स्थानावर आहेत. भारताचा शेजारी देश चीन 3 सुवर्ण पदकांसह (एकूण 6) सहाव्या स्थानी आहे.
पॅरिस ऑलिम्पिक 2024 पदक तालिका –
(1) जपान – 7 पदकं (4 सुवर्ण, 2 रौप्य, 1 कांस्य)
(2) ऑस्ट्रेलिया – 6 पदकं (4 सुवर्ण, 2 रौप्य, 0 कांस्य)
(3) अमेरिका – 12 पदकं (3 सुवर्ण, 6 रौप्य, 3 कांस्य)
(4) फ्रान्स – 8 पदकं (3 सुवर्ण, 3 रौप्य, 2 कांस्य)
(5) दक्षिण कोरिया – 6 पदकं (3 सुवर्ण, 2 रौप्य, 1 कांस्य)
(6) चीन – 6 पदकं (3 सुवर्ण, 1 रौप्य, 2 कांस्य)
(7) इटली – 6 पदकं (1 सुवर्ण, 2 रौप्य 3 कांस्य )
(8) कझाकस्तान – 3 पदकं (1 सुवर्ण, 0 रौप्य, 2 कांस्य)
(9) बेल्जियम – 2 पदकं (1 सुवर्ण, 0 रौप्य, 1 कांस्य )
(10) जर्मनी – 1 पदक (1 सुवर्ण, 0 रौप्य, 0 कांस्य)
(22) भारत – 1 पदक (1 कांस्य)
आज (सोमवार, 29 जुलै) ऑलिम्पिकच्या तिसऱ्या दिवशी भारताला एक-दोन नव्हे तर तीन सुवर्ण पदकं मिळू शकतात. यामध्ये वैयक्तिक दोन आणि एका सांघिक पदकाचा समावेश आहे. भारताला नेमबाजीत दोन वैयक्तिक पदकं मिळू शकतात. तर तिरंदाजीत एक पदक मिळण्याची आशा आहे.
नेमबाजीत रमिता जिंदाल आणि अर्जुन बाबुता अंतिम फेरीत पोहचले आहेत. दोघं 10 मीटर एअर रायफल इव्हेंटमध्ये भाग घेत आहेत. याशिवाय धीरज बोम्मादेवरा, तरुणदीप राय आणि प्रवीण जाधव यांच्या तिरंदाजी संघाकडूनही भारताला पदकाची अपेक्षा आहे.
हेही वाचा –
यशस्वीचा धमाका, बिश्नोईच्या फिरकीची जादू….भारतानं श्रीलंकेविरुद्धची मालिका सहज खिशात घातली
भाड्यानं पिस्तूल घेऊन राष्ट्रीय स्पर्धा खेळली… वीरेंद्र सेहवागकडून घेतले होते क्रिकेटचे धडे; आश्चर्यकारक आहे मनू भाकरची कहाणी
शाब्बास मनू! पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतानं जिंकलं पहिलं मेडल; नेमबाजीत कांस्य पदकावर निशाणा