भारताची युवा नेमबाज मनू भाकर हिने मागील महिन्यात पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये तिच्या ऐतिहासिक कामगिरीने देशाचा गौरव केला. मनूने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल आणि 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात दोन कांस्यपदके जिंकली. या यशामुळे एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत एकापेक्षा जास्त पदके जिंकणारी मनू भारतातील पहिली ॲथलीट बनली आहे. असे असूनही, मनू भाकरला अलीकडेच सोशल मीडियावर ट्रोलचा सामना करावा लागला. जेव्हा तिने नेहमी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये तिच्यासोबत ऑलिम्पिक पदके घेऊन जाण्यास सुरुवात केली.
मनू भाकरने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. मनूने पोस्ट करत लिहले आहे की, “पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये जिंकलेली माझी दोन कांस्य पदके भारताची आहेत. जेव्हा जेव्हा मला कोणत्याही कार्यक्रमात आमंत्रित केले जाते आणि पदके दाखवण्यास सांगितले जाते तेव्हा मला त्यांना अभिमानाने दाखवावे लागते त्यामुळे मी नेहमी ही पदके सोबत बाळगते. तसेच हा माझा सुंदर प्रवास शेअर करण्याचा मार्ग आहे.”
The two bronze medals I won at the Paris 2024 Olympics belong to India. Whenever I am invited for any event and asked to show these medals, I do it with pride. This is my way of sharing my beautiful journey.@Paris2024 #Medals #India pic.twitter.com/UKONZlX2x4
— Manu Bhaker🇮🇳 (@realmanubhaker) September 25, 2024
मनूवर सगळीकडे पदकं दाखवण्याचं ‘वेड’ असल्याचा आरोप करणाऱ्या ट्रोल करणाऱ्यांना हे चोख प्रत्युत्तर होतं. मनूने अनेक इव्हेंट्समध्ये भाग घेतला होता. ज्या ठिकाणी तिने ती मेडल्स घेऊन जायची. यावर ट्रोलर्सनी तिची अनेकवेळा खिल्ली उडवली. की ती नेहमी मेडल्स सोबतच असते.
सध्या मनू भाकर ब्रेकवर असून पुढील तीन महिने ती स्पर्धेत परतणार नसल्याचे संकेत तिच्या प्रशिक्षकाने दिले आहेत. या दरम्यान, तिने यापूर्वीच दोन ऑलिम्पिक आणि जागतिक चॅम्पियनशिप पदके, 19 विश्वचषक पदके आणि राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रत्येकी एक सुवर्णपदक जिंकले आहे.
हेही वाचा-
IPL 2025: रिटेंशनबाबत बीसीसीआय घेऊ शकते हा निर्णय, मुंबई इंडियन्सला मोठा होणार फायदा?
IPL 2025: हा अनुभवी खेळाडू 10 वर्षांनंतर ‘सीएसके’मध्ये परतणार!
दुसऱ्या कसोटीवर पावसाचं सावट! सामना रद्द झाल्यास WTC गुणतालिकेत भारताचे नुकसान?