भारतीय महिला कुस्तीपटू निशा दहियाचा (Nisha Dahiya) 68 किलो फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभव झाला. उत्तर कोरियाच्या सोल गमने तिचा 10-8 अशा फरकाने पराभव केला. यासह निशाचा 2024 च्या ऑलिम्पिकमधील प्रवास संपला. या सामन्यात तीला मोठी दुखापत झाली. आता याबाबत मोठी अपडेट समोर येत आहे.
निशा हिला दुखापत झाल्यानंतर आता भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक वीरेंद्र दहिया यांनी कोरियन संघावर मोठा आरोप केला आहे. कोरियाच्या प्रशिक्षकांनी आपल्या खेळाडूला निशाचा हात ओढण्यास सांगून दुखापतग्रस्त करायला लावले असे त्यांनी म्हटले. ते म्हणाले,
“निशाने इतकी मोठी आघाडी घेतल्यानंतर, विरोधी प्रशिक्षकांनी खेळाडूला दुखापतग्रस्त कर असा इशारा केला. निशा नक्की मेडल जिंकली असती. हा तिच्यावर झालेला अन्याय आहे.”
एकवेळ निशा सामन्यात 8-1 अशी आघाडीवर होती. मात्र, तिला दुखापत झाल्यानंतर उत्तर कोरियाच्या कुस्तीपटूने या संधीचा फायदा घेत 11 सेकंदात चार गुण मिळवले आणि स्कोर 8-8 असा बरोबरीत सुटला. जेव्हा सामना संपायला 12 सेकंद बाकी होते. त्यानंतर निशाला आणखी वेदना जाणवू लागल्या आणि सामना पुन्हा थांबवण्यात आला. फिजिओने निशावर उपचार केले, पण निशाकडे पाहून उजव्या हाताला तीव्र वेदना होत असल्याचे दिसून आले.
त्यावेळी ती रडू लागली. मात्र, ती अजूनही जिंकू शकते, असे प्रशिक्षकानं निशाला सांगितले. स्कोर 8-8 असा बरोबरीत राहिला असता तर निशा उपांत्य फेरीत पोहोचली असती. मात्र, शेवटच्या 12 सेकंदात उत्तर कोरियाच्या कुस्तीपटूने 2 गुण मिळवले आणि सामना 10-8 असा जिंकला. मात्र, पुढच्या फेरीत पराभूत झाल्याने तिला देखील अंतिम फेरी गाठता आली नाही.
महिला कुस्तीत भारतीय पथकाला विनेश फोगट व अंतिम पंघल यांच्याकडून अपेक्षा आहेत. तर, पुरुष कुस्तीत एकटा अमन सेहरावत आव्हान सादर करेल.
महत्त्वाच्या बातम्या-
पोलार्डनं ठोकला खतरनाक षटकार! समालोचन करणारा संगकारा थोडक्यात हुकला, पाहा VIDEO
बांगलादेशचा हिंदू क्रिकेटपटू लिटन दासचं आंदोलकांनी खरंच घर पेटवलं का? जाणून घ्या सत्य
आयपीएल 2025च्या हंगामात बदलणार 6 संघांचे कर्णधार?