पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये विनेश फोगटच्या अपात्रतेनंतर सर्व भारतीयांना धक्का बसला आहे. यामुळे संपूर्ण देशात संतापाचं वातावरण आहे. दरम्यान, याबाबत आता आणखी एक अपडेट समोर आलं आहे. एका भारतीय प्रशिक्षकाने सांगितलं की, विनेशचं वजन सकाळी 100 ग्रॅम जास्त असल्याचं आढळलं.
विनेशनं 50 किलो वजनी गटात भाग घेतला आहे. मंगळवारी (6 ऑगस्ट) रात्री विनेशचं वजन 52 किलो होतं. तिनं सायकलिंग, स्किपिंग इत्यादी व्यायाम करून वजन कमी करण्याचा प्रयत्न केला, पण तिला यश आलं नाही. गगन नारंग, दिनशॉ परडीवाला, तिचे पती, फिजिओ, वैद्यकीय कर्मचारी आणि IOA अधिकारी यांनी मिळून तिचं वजन कमी करण्यासाठी रात्रभर प्रयत्न केले. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. पार्डीवाला यांनी सांगितलं की, आम्ही तिचा जीव धोक्यात घालू शकत नाही. विनेशनं शक्य ते सर्व प्रयत्न केल्याची माहिती मीडियाला मिळाली आहे.
अपात्रतेची बातमी ऐकल्यानंतर विनेश फोगट बेशुद्ध झाल्याची बातमी समोर आली आहे. विनेशला पॅरिसच्या ऑलिम्पिक व्हिलेजमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. मिळालेल्या माहितीनुसार, तिला आयव्ही फ्लुइड देण्याची शिफारस करण्यात आली आहे. डिहायड्रेशनमुळे विनेशला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. विनेश सध्या ऑलिम्पिक व्हिलेजच्या पॉलीक्लिनिकमध्ये आहे. तिची प्रकृती स्थिर असून ती विश्रांती घेत आहे. तिला लवकरच डिस्चार्ग मिळू शकतो.
भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनकडे या निर्णयाविरुद्ध अपील करण्याचा पर्याय नाही. विनेशला अपात्र ठरवण्यात आल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी सरकार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यामागे सरकार आणि ब्रिजभूषण सिंह यांचा हात असल्याचं विनेश फोगटचे सासरे म्हणाले.
हेही वाचा –
अपात्रतेची बातमी ऐकून विनेश फोगटची तब्बेत बिघडली, पॅरिसमधील रुग्णालयात दाखल
2 कुस्तीपटू आणि 2 मोठे वाद; विनेश फोगट आणि निशा दहिया यांच्याकडून पदक हिसकावले?
“विनेश, तू चॅम्पियन…”,ऑलिम्पिकमधून अपात्र ठरल्यानंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया समोर