भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटला (Vinesh Phogat) पॅरिस ऑलिंपिक्समध्ये अंतिम सामन्यापूर्वी अपात्र घोषित करण्यात आले होते. यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. देशातील सर्व क्रीडाप्रेमींचे सुवर्णपदकाचे स्वप्न भंगले. मात्र, या कठीण काळात सर्व देशवासिय विनेशसोबत आहेत. अनेक सेलिब्रिटी तिच्याबद्दल ट्विट करत आहेत. वजन जास्त असल्याने विनेशला अंतिम फेरीपूर्वी अपात्र घोषित करण्यात आले होते. तथापि, या प्रकरणी भारताने क्रीडा लवादाकडे (कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट) अपील केले आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर माजी भारतीय क्रिकेटर सचिन तेंडुलकरनेही (Sachin Tendulkar) ट्विट केले आहे.
सचिन तेंडुलकर विनेशच्या समर्थनार्थ पुढे आला आणि म्हणाला, ‘प्रत्येक खेळाचे नियम असतात आणि त्या नियमांना संदर्भाने पाहिले पाहिजे. विनेश फोगटने योग्य वजन ठेवताना अंतिम फेरी गाठली होती. त्यामुळे मला वाटते की, तिला रौप्य पदक न देणे हा निव्वळ अप्रामाणिकपणा असेल आणि अशा नियमांना काही अर्थ नाही.’
सचिन तेंडुलकरने पुढे आपल्या वक्तव्यात म्हटले आहे की, ‘जर एखादा खेळाडू ड्रग्ज घेताना किंवा बेईमानी करताना पकडला गेला तर त्याला अपात्र ठरवले जाते. मात्र, विनेशच्या बाबतीत असे काहीही झाले नाही. विनेशने कोणतीही फसवणूक न करता तिच्या सर्व प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला आहे, त्यामुळे ती रौप्य पदकाची पात्र आहे.’
#VineshPhogat #Paris2024 #Olympics @WeAreTeamIndia pic.twitter.com/LKL4mFlLQq
— Sachin Tendulkar (@sachin_rt) August 9, 2024
विनेश फोगटने पहिल्याच फेरीत गत ऑलिम्पिक चॅम्पियनला पराभूत करून सर्वांनाच थक्क केले होते. त्यानंतर उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीतही तीने मोठ्या फरकाने सामने जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र, अंतिम फेरीच्या दिवशी पुन्हा एकदा वजन करताना तिचे वजन 100 ग्रॅम अधिक भरल्याने तिला अपात्र घोषित केले गेले. या प्रकरणानंतर तिने कुस्तीमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
विनोद कांबळीचा तो व्हायरल व्हिडिओ खरा आहे का? जवळच्या मित्रानं दिलं प्रकृतीचं अपडेट
“माझं नाव हटवा, मला खूप काम आहेत” इंग्लंडचा प्रशिक्षक बनण्यासाठी इच्छुक नाही ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ दिग्गज
विनेश फोगटला रौप्य पदक मिळणार की नाही? या दिवशी येणार कोर्टाचा निर्णय