---Advertisement---

नीता अंबानींची पुन्हा एकदा आतंरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्यपदी निवड

On: शुक्रवार, जुलै 26, 2024 6:25 PM
---Advertisement---

Nita Ambani Re-elected as IOC Member :- उद्योजक मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांना क्रीडा क्षेत्रात खास रुची आहे. त्या 2008 पासून इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) मुंबई इंडियन्स फ्रँचायझीचा कारभार सांभाळत आहेत. बऱ्याचदा मुंबई इंडियन्सच्या सामन्यावेळी त्या स्टेडियममध्ये देखील उपस्थित असतात. दरम्यान आता नीता अंबानी यांची आतंरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्य म्हणून पुन्हा एकदा निवड झाली आहे. रिलायन्स फाऊंडेशनने सोशल मीडियावर अधिकृतपणे तशी माहिती दिली आहे.

रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा आणि मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांची भारताकडून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्य म्हणून पुन्हा निवड झाली आहे. 2016 मध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये नीता अंबानी यांना पहिल्यांदा आयओसीचे सदस्य बनवण्यात आले होते. अशा प्रकारे 8 वर्षांनंतर त्यांना दुसऱ्यांदा हा सन्मान मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीसाठी भारताच्या बाजूने सदस्य होण्यासाठी त्यांना सर्व 93 मतांचा पाठिंबा मिळाला आहे.

“आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीवर पुन्हा एकदा निवड झाल्यामुळे मला फार सन्मानित झाल्यासारखं वाटत आहे. राष्ट्रपती थॉमस बाक आणि आयओसीच्या माझ्या सर्व सहकाऱ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. या आनंदाच्या आणि अभिमानाच्या क्षणाला भारतीय नागरिकांसोबत शेअर करायचे आहे. भारत तसेच जगभरात ऑलिम्पिकचा आणखी प्रचार आणि ऑलिम्पिकच्या मजबुतीकरणाच्या प्रयत्नांना कायम ठेवण्यासाठी मी तत्पर आहे,” अशा भावना नीता अंबानी यांनी व्यक्त केल्या आहेत.

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक मुकेश अंबानी यांच्या पत्नीने या खास प्रसंगी परिधान करण्यासाठी लक्झरी ब्रँड चॅनेलचा ब्लेझर निवडला. या चॅनेलच्या आलिशान ब्लेझरची मूळ किंमत 6891 दिरहम (संयुक्त अरब अमिरातीचे चलन) आहे. भारतीय चलनात पाहिल्यास ते 1.57 लाख रुपये आहे. या जागतिक क्रीडा स्पर्धेसाठी नीता अंबानी यांनी निवडलेला लूक चर्चेचा विषय बनला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

आशिया चषक 2024 : सेमिफायनलमध्ये रेणुका सिंगचा कहर! भारताचा सलग नवव्यांदा फायनलमध्ये प्रवेश
गौतम गंभीरचा स्पेशल प्लॅन, टीम इंडियातही होणार केकेआर प्रमाणे प्रयोग! हा खेळाडू घेणार सुनील नारायणची जागा
पंजाब किंग्जचं नशीब बदलेल? रणजी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दिग्गज बनू शकतो मुख्य प्रशिक्षक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---