पॅरिस पॅरालिम्पिकच्या नवव्या दिवशी भारताच्या खात्यात एकूण 5 पदके येऊ शकतात. आतापर्यंत पूर्ण झालेल्या 8 दिवसांत भारताच्या खात्यात 25 पदके जमा झाली आहेत. आता आज (06 सप्टेंबर, शुक्रवार) म्हणजेच नवव्या दिवशी 5 पदकांसह भारताच्या खात्यात 30 पदके जमा होऊ शकतात. चला तर मग या बातमीद्वारे जाणून घेऊया नवव्या दिवशी कोणत्या खेळातून भारताला पदक जिंकण्याची अपेक्षा आहे.
भारताला आज मिळणारी पाचही पदके जवळपास निश्चित वाटत आहेत. कारण खेळाडूंना पदकासाठी पात्र ठरण्याची गरज नाही. पाचही खेळाडू पदकांसाठी फायनल स्पर्धा खेळण्यासाठी मैदानात उतरतील. भारताला दिवसाचे पहिले पदक पुरुषांच्या भालाफेक F54 मध्ये मिळू शकते. ज्यासाठी दिपेश कुमार अंतिम फेरीत मैदानात उतरेल.
याशिवाय दुसरे पदक पुरुषांच्या उंच उडी T44, T62, T64 मध्ये येऊ शकते. ज्याच्या अंतिम फेरीत प्रवीण कुमार मैदानात उतरेल. त्यानंतर महिलांच्या पॉवरलिफ्टिंगच्या 67 किलोपर्यंतच्या अंतिम फेरीत कस्तुरी राजमनी तिसरे पदक जिंकू शकते. त्यानंतर चौथे पदक महिलांच्या भालाफेक अंतिम F46 मध्ये येऊ शकते आणि पाचवे पदक पुरुषांच्या शॉट पुट F56, F57 मध्ये येऊ शकते.
पॅरिस पॅरालिम्पिकचा आठवा दिवस भारतासाठी काही खास नव्हता. 8व्या दिवशी भारताला 8 पदके मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र एकच पदक आले. कपिल परमारने पुरुषांच्या ज्युदो 60 किलो J1 मध्ये एकमेव पदक जिंकले.
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताचे आजचे वेळापत्रक
पॅरा कॅनोइंग
दुपारी 1:30 वाजता – यश कुमार – पुरुष कयाक एकल 200 मी KL1 हीट्स
पॅरा ऍथलेटिक्स
दुपारी 1:38 वाजता – सिमरन शर्मा – महिला 200 मी टी12 फेरी
पॅरा कॅनोइंग
दुपारी 1:50 वाजता – प्राची यादव – महिला एकेरी 200 मी VL2 हीट
पॅरा ऍथलेटिक्स
दुपारी 2:07 वाजता – दीपेश कुमार – पुरुष भालाफेक F54 अंतिम
पॅरा ऍथलेटिक्स
दुपारी 2:50 वाजता – दिलीप गावित – पुरुष 400मी T47 फेरी 1
पॅरा कॅनोइंग
दुपारी 2:55 वाजता – पूजा ओझा – महिला कयाक एकल 200m KL1 हीट्स
पॅरा ऍथलेटिक्स
दुपारी 3.21 वाजता – प्रवीण कुमार – पुरुष उंच उडी T64 अंतिम
पॉवरलिफ्टिंग पॅरा
रात्री 8.30 वाजता – कस्तुरी राजमणी – महिला 67 किलो फायनल
पॅरा ऍथलेटिक्स
रात्री 10:30 वाजता – भावनाबेन आजबाजी चौधरी – महिला भालाफेक F46 फायनल
पॅरा ऍथलेटिक्स
रात्री 10:34 वाजता – सोमण राणा, होकाटो हॉटझे सेमा – पुरुषांचा शॉट पुट F57 अंतिम
पॅरा ऍथलेटिक्स
रात्री 11:12 वाजता – सिमरन शर्मा महिलांची 200 मीटर T12 उपांत्य फेरी (पात्र असल्यास)
हेही वाचा-
लय भारी! पॅरालिम्पिकच्या इतिहासात ज्युदोमध्ये भारताचे पहिलेच पदक
‘तो सर्व काही ऐकत राहिला कारण..’, केएल राहुल-संजीव गोयंका वादावर मोठा खुलासा
मुंबईत जुन्या मित्रांसोबत रमला अगस्त्य, पण अजूनही वडील हार्दिकशी भेट न झाल्याने चर्चांना उधाण