भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीने काही महिन्यांआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. मात्र धोनीच्या अनुपस्थितीत, यष्टीरक्षक फलंदाज म्हणून भारतीय संघात कुणाची वर्णी लागेल? हा एक मोठा प्रश्न होता. क्रिकेट क्षेत्रांतील अनेक दिग्गजांनी युवा प्रतिभावान फलंदाज रिषभ पंत याच्या नावाला समर्थन दिले. मात्र, राष्ट्रीय संघात संधी मिळूनही पंतने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही. आयपीएल 2020 मध्येही पंत फॉर्म मिळवण्यासाठी झुंजताना दिसला. अशातच भारतीय क्रिकेट संघातून नुकताच निवृत्त झालेला अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेल याने पंतचे कौतुक केले आणि त्याला मोलाचा सल्लाही दिला.
पंतच्या प्रतीभेमुळेच लोकं त्याची करतात चर्चा
स्टार स्पोर्ट्स या क्रीडा वाहिनीवरील स्पोर्ट्सतक या शोमध्ये बोलताना पार्थिव म्हणाला की, “रिषभ पंतमध्ये प्रतिभेची कमतरता नाही, यात काहीच शंका नाही. जेव्हा मी त्याच्याशी भेटतो, तेव्हा त्याला सांगतो की, तुझ्याकडे असलेल्या प्रतिभेमुळेच लोकं तुझ्याविषयी चर्चा करतात. या प्रतिभेच्या साहाय्याने धावा कशा फटकावायच्या, हे तुझ्यावर अवलंबून आहे.”
पंतने धावा कशा करायच्या यावर द्यावं अधिक लक्ष
पुढे बोलताना पार्थिव म्हणाला की, “लॉकडाऊनमध्ये पार्थिवचं वजन थोडं वाढलं होतं. मात्र, वजन वाढवण्याऐवजी धावा कशा करायच्या, या गोष्टीवर त्याला अधिक लक्ष द्यायला पाहिजे होतं. असे असूनही तो चांगले पुनरागमन करेल, असा मला विश्वास आहे.”
आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी तो तयार आहे, हे त्याला करावे लागेल सिद्ध
“भारतीय राष्ट्रीय संघात निवड होण्यापासून कोणताही खेळाडू दूर नसतो. त्याचा फक्त स्वतःवर विश्वास असणे आवश्यक आहे. तो राष्ट्रीय संघासाठी किती महत्वाचा आहे, हे दाखवण्यासाठी पंतला देशांतर्गत क्रिकेटमध्ये अधिक धावा कराव्या लागतील आणि यासोबतच चांगले यष्टीरक्षणही करावे लागेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी तो तयार आहे, हे त्याला सिद्ध करावे लागेल.” असेही पुढे बोलताना पंत म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषकात ‘या’ खेळाडूने करावे भारतीय संघाचे नेतृत्त्व; पार्थिव पटेलने मांडले मत
ट्रेंडिंग लेख-
शाहरुख खानच्या ५ क्रिकेटवरील जाहिराती, ज्यांनी एकवेळी घातला होता धुमाकूळ
अठरा वर्षांची ‘छोटीशी’ क्रिकेट कारकीर्द खेळलेला ‘पार्थिव पटेल’
अवघ्या अठराव्या वर्षी पार्थिव पटेल खेळला चक्क विश्वचषक; वाचा कशी झाली कारकिर्दीची सुरुवात