---Advertisement---

‘वडापाव मी कधी खाल्ला नाही’, मुंबईतील प्रसिद्ध पदार्थाबद्दल चाहत्याच्या उत्तरावर कमिन्सची लक्षवेधी प्रतिक्रिया

On: शुक्रवार, मे 6, 2022 11:49 AM
Pat-Cummins
---Advertisement---

भारतात सध्या इंडियन प्रीमियर लीग २०२२ स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेसाठी जगभरातील विविध ठिकाणचे खेळाडू विविध संघांचे प्रतिनिधित्त्व करताना दिसत आहेत. यादरम्यान, भारतातील खाद्य संस्कृती ही या खेळाडूंसाठी विशेष आकर्षण ठरत असते. नुकताच याचा प्रत्येय आला आहे. ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्स याने मुंबईतील प्रसिद्ध पदार्थाबद्दल सोशल मीडियावर विचारणा केली होती, ज्यावर त्याला विविध प्रतिक्रिया आल्या. 

कमिन्स (Pat Cummins) सध्या आयपीएल २०२२ मध्ये (IPL 2022) कोलकाता नाईट रायडर्स संघाचे (Kolkata Knight Riders) प्रतिनिधित्त्व करत आहे. तसेच या स्पर्धेतील सर्वाधिक लीग सामने हे मुंबईत (Mumbai) खेळवले जात आहेत. त्यामुळे जवळपास गेल्या एक महिन्यापासून खेळाडूंचे वास्तव्य मुंबईत आहे. त्यामुळे कमिन्सनेही सोशल मीडियावर प्रश्न विचारला की, ‘माझे मुंबईतील फॉलोवर्स, जेवणासाठी मी कोणता स्थानिक पदार्थ चाखून पाहायला पाहिजे, कारण मी इथे आहे.’

कमिन्सच्या या प्रश्नावर विविध उत्तरे आली आहेत. एका युजरने त्याला मुंबईचा प्रसिद्ध वडापाव खाण्याचे सुचवले आहे. यावर कमिन्सनेही उत्तर दिले आहे. त्याने लिहिले, ‘वडापाव छान वाटत आहे, मी याआधी कधी खाल्लेला नाही.’ तसेच अनेकांनी कमिन्सला पावभाजी खाण्यासही सुचवले आहे.

https://twitter.com/on_drive23/status/1522210947741679616

अखेर काही वेळाने कमिन्सने पावभाजीचा फोटो शेअर करत हाच पदार्थ चाखल्याचे सांगितले. एका युजरने पावभाजीबद्दल प्रतिक्रिया देण्यास सांगितल्यानंतर कमिन्सने लिहिले की, ‘वाह, मी गेले ११ वर्षे भारतात येत आहे, पण कसं काय यापूर्वी हा पदार्थ चाखला नव्हता. मस्त.’

कमिन्सची आयपीएल २०२२ मधील कामगिरी समाधानकारक झाली आहे. त्याने आत्तापर्यंत या हंगामात ४ सामने खेळले आहेत. त्यात त्याने ४ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच फलंदाजी करताना त्याने एका अर्धशतकासह ६३ धावा केल्या आहेत.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या – 

‘मी म्हतारा होतोय’, सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतर असं का म्हणाला वॉर्नर, वाचा सविस्तर

Video: भुवनेश्वरने ऐनवेळी बदलली भूमिका, मग वॉर्नरनेही अफलातून शॉटने दाखवला आपला क्लास

बड्या दिलाचा वॉर्नर! स्वत:च्या शतकाची नाही केली पर्वा, संधी असूनही पॉवेलला म्हणाला, तोडूनफोडून टाक!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---