भारताचा युवा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल याने आपल्या दमदार फलंदाजीने कमी वेळेत सर्वांच्या मनावर ताबा मिळवला आहे. काही दिवसांपुर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या बॉक्सिंग डे सामन्यातून त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या सामन्यात दोन्ही डावात शानदार खेळी करत त्याने कसोटी संघातील आपले स्थान टिकवून ठेवले. त्यानंतर गुरुवारपासून (७ जानेवारी) भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सिडनी येथे चालू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातही त्याने चांगली सुरुवात केली होती. पण ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने त्याला आपल्या जाळ्यात फसवले.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ३३८ धावा केल्या होत्या. त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या भारताकडून धाकड फलंदाज रोहित शर्मा आणि गिल सलामीला फलंदाजीसाठी आले होते. मात्र संघाच्या ७० धावांवर रोहितची विकेट घेत ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज जोश हेजलवुडने त्यांची भागिदारी मोडली.
त्यानंतर कसोटी स्पेशलिस्ट चेतेश्वर पुजारासोबत मिळून गिल संघाचा डाव पुढे नेत होता. अशात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेनने फॉर्मात असलेल्या गिलला बाद करण्यासाठी कमिन्सचे अस्त्र करण्याचा विचार केला. त्या अनुशंगाने त्याने कमिन्सकडे डावातील ३३वे सोपवले. गिलने कमिन्सच्या षटकातील पहिल्या चेंडूवर हलकासा शॉट मारण्याचा प्रयत्न केला. परंतु चेंडू बॅटला लागून आऊटसाइड एजच्या दिशेने गेला. तिथे कॅमरॉन ग्रीन आधीपासूनच सावध होता. त्याने डाव्या बाजूला पूर्ण शरीर झुकवत दोन्ही हातांनी गिलचा झेल टिपला.
Sharp work from Cam Green to hold on and remove the dangerous Gill! #OhWhatAFeeling#AUSvIND | @Toyota_Aus pic.twitter.com/8n43huKZJC
— cricket.com.au (@cricketcomau) January 8, 2021
अशाप्रकारे १०१ चेंडूत ८ चौकारांच्या मदतीने ५० धावा करत गिल मैदानाबाहेर पडला. हे गिलचे कसोटी कारकिर्दीतील पहिले अर्धशतक ठरले. दुसऱ्या दिवसाखेर गिल आणि रोहितच्या रुपात भारताने २ विकेट्स गमावत ९६ धावा केल्या. चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार अजिंक्य रहाणे फलंदाजी करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
बापरे! तब्बल ‘इतक्या’ वर्षांनंतर भारतीय सलामीवीरांनी बाद न होता खेळली २० षटके
‘या’ कसोटी फलंदाजांची नावे ऐकून गोलंदाजांचा उडतो थरकाप, काढल्यात खोऱ्याने धावा
वनडे, टी२० आणि कसोटीत ‘हा’ पराक्रम करणारा रोहित दुसराच, मग पहिलं नाव कुणाचं? वाचा