ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (australia vs england) या दोन्ही संघांमध्ये ऐतिहासिक ऍशेस मालिकेला (ahses test series) प्रारंभ झाला आहे. ही मालिका सुरु होण्यापूर्वी क्रिकेट ऑस्ट्रेलियाला मोठा निर्णय घ्यावा लागला होता. टीम पेनने वादात अडकल्यानंतर कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पॅट कमिन्सला (pat Cummins) कर्णधारपद देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
गेल्या कित्येक वर्षांच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडले होते, जेव्हा वेगवान गोलंदाजाला ऑस्ट्रेलिया संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. परंतु, त्याने ही जबाबदारी योग्यरीत्या पार पाडली. यासह पहिल्याच सामन्यात मोठा विक्रम करत दिग्गजांच्या यादीत स्थान मिळवले आहे. (Pat Cummins five wicket hauls)
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये गॅबाच्या मैदानावर पहिला कसोटी सामना सुरू आहे. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने इंग्लंडच्या ५ फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यासह तो रिची बेनोडनंतर ऍशेस मालिकेत कर्णधार म्हणून ५ गडी बाद करणारा दुसराच ऑस्ट्रेलियन कर्णधार ठरला आहे. तब्बल ५९ वर्षानंतर पॅट कमिन्सने पुन्हा एकदा हा कारनामा केला आहे.
तसेच हा कर्णधार म्हणून पॅट कमिन्सचा पहिलाच कसोटी सामना होता. तसेच कसोटी पदार्पणात गोलंदाजी करताना ५ गडी बाद करणारा तो पहिलाच कर्णधार ठरला आहे. त्याचबरोबर कर्णधार म्हणून ऑस्ट्रेलियाकडून एका डावात ५ विकेट्स घेणारा तो २०१२ नंतरचा पहिलाच गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी अखेरच्या वेळी असा कारनामा २०१२ साली मायकल क्लार्कने केला होता.
पहिल्याच कसोटी सामन्यात अप्रतिम गोलंदाजी करत आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. तो कर्णधार म्हणून एकाच डावात ५ गडी बाद करण्याचा पराक्रम करणारा ८ वा ऑस्ट्रेलियन कर्णधार ठरला आहे. यापूर्वी असा कारनामा करणारा जॉर्ज गिफेनने ३ वेळेस केला होता, तर रीची बेनॉडने ९ वेळेस, ॲलेन बोर्डरने २ वेळेस, तर ह्यू ट्रंबल, माँटी नोबल, इयान जॉन्सन, मायकल क्लार्क आणि पॅट कमिन्सने हा कारनामा एक-एक वेळेस केला आहे.
एका डावात ५ गडी बाद करणारे ऑस्ट्रेलियन कर्णधार:
जॉर्ज गिफेन (३)
ह्यू ट्रंबल (१)
माँटी नोबल (१)
इयान जॉन्सन (१)
रिची बेनॉड (९)
ॲलेन बॉर्डर (२)
मायकेल क्लार्क (१)
पॅट कमिन्स (१)
महत्वाच्या बातम्या :
ऐतिहासिक वनडे द्विशतकाला १० वर्षे पूर्ण; आजच्याच दिवशी सेहवागने काढली होती विंडीज गोलंदाजांची पिसं
“आम्हाला आयपीएलचे आजोबा म्हणून हिणवले गेलेले, पण आम्ही…”; सीएसकेच्या खेळाडूने बोलून दाखवले शल्य
न्यूझीलंडला धक्का! केन विलियम्सन ‘इतक्या’ दिवस राहणार क्रिकेटपासून दूर