मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात अटीतटीचा सामना पहायला मिळाला. या सामन्यात धोनीच्या चेन्नई सुपर किंगज संघाने, मॉर्गनच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाला १८ धावांनी पराभूत केले. या सामन्यात जरी ही कोलकाता नाईट रायडर्स संघाचा पराभव झाला असला तरी देखील प्रेक्षकांना पॅट कमिन्स कडून तुफान फटकेबाजी पाहायला मिळाली. त्याने सॅम करनच्या षटकात मारलेल्या फटक्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून फाफ डू प्लेसीची नाबाद ९५ धावांची खेळी आणि ऋतुराज गायकवाडच्या ६४ धावांच्या खेळीच्या जोरावर चेन्नईने २२० धावांचा डोंगर उभारला होता. या धावांचा पाठलाग करताना कोलकाता संघाकडून पॅट कमिन्सने ६६ धावांची तुफानी खेळी केली होती. यात त्याने सॅम करनच्या एकाच षटकात ३० धावा ठोकल्या. यामध्ये ४ षटकार आणि १ चौकाराचा समावेश आहे.
त्याने करनच्या पहिल्या चेंडूवर २ धावा काढल्या होत्या. त्यानंतर त्याने एकापाठोपाठ एक ३ षटकार लगावले. त्यांनतर ५व्या चेंडूवर चौकार आणि शेवटच्या चेंडूवर त्याने पुन्हा षटकार लगावला होता. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात कमिन्सला कोणाचीही साथ मिळाली नाही. त्यामुळे कोलकाता संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
पाहा व्हिडिओ –
https://www.iplt20.com/video/233365/1-over-30-runs-cummins-clobbers-curran
प्रथम फलंदाजी करताना चेन्नई संघाने २० षटक अखेर ३ गडी बाद २२० धावा केल्या होत्या. यामध्ये फाफ डू प्लेसिने ४ षटकार आणि ९ चौकार लगावत ९५ धावांची नाबाद खेळी केली होती. तसेच ऋतुराज गायकवाडने ६४ धावांची खेळी केली आहे. चेन्नईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना, पॅट कमिन्सने ६६ धावांची तुफानी खेळी केली होत. यात त्याने ४ चौकार आणि तब्बल ६ षटकार लगावले होते. तसेच आंद्रे रसलने ५४ आणि दिनेश कार्तिकने ४० धावांची खेळी केला. मात्र त्यांची ही खेळी कोलकात्याला विजय मिळवून देण्यसाठी अपुरी पडली.
महत्वाच्या बातम्या:
आयसीसीची मोठी कारवाई! या कारणामुळे युएईच्या खेळाडूवर ५ वर्षांची बंदी
ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपच्या शर्यतीत भारतीय खेळाडू आघाडीवर, पाहा कोणाचा आहे टॉप ५ मध्ये समावेश
पॅट कमिन्सने सॅम करनला एकाच षटकात ठोकल्या ३० धावा, गेल-रैना-कोहली यांच्या पंक्तीत मिळवले स्थान