इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगाम आता अखेरच्या टप्प्यात आला आहे. अशाच कोलकाता नाईट रायडर्स याला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स उर्वरित आयपीएल २०२२ हंगामातून बाहेर गेला आहे. याबद्दल शुक्रवारी माहिती समोर आली आहे.
त्याला नितंबाची दुखापत (Hip Injury) झाली असून याच कारणामुळे तो आयपीएल २०२२ हंगामाच्या उर्वरित सामन्यांतून बाहेर (Ruled out of IPL 2022) झाला आहे. तो आयपीएल २०२२ स्पर्धा (IPL 2022) खेळायला आला, तेव्हापासूनच दुखापतीने त्रस्त होता. मात्र, त्याची दुखापत तेव्हा फार गंभीर नव्हती. तरी, त्याला या हंगामात दुखापतीमुळे ५ सामनेच खेळता आले.
पण, आता कोलकाताला (Kolkata Knight Riders) आयपीएल २०२२ च्या प्लेऑफमध्ये जाण्यासाठी चमत्कारावर आणि अन्य संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे. त्याचमुळे त्यांच्या प्लेऑफमधील जाण्याचा आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. त्यांना १२ पैकी केवळ ५ सामने जिंकता आल्या आहेत. त्यामुळे आता कमिन्सने (Pat Cummins) दुखापतीबद्दल जास्त जोखीम न पत्करता सिडनीला परत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
तो परत गेल्यावर दुखापतीवर काम करेल. कारण त्याला पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियाकडून श्रीलंकेविरुद्ध वनडे आणि कसोटी मालिका खेळायची आहे. तसेच कमिन्स ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधारही आहे आणि त्यांच्या संघातील एक प्रमुख खेळाडू आहे. त्याचमुळे त्याच्या दुखापतीबद्दल जास्त जोखीम घेणे ऑस्ट्रेलियासाठी घातक ठरू शकते. त्याचमुळे तो आता काहीदिवस विश्रांती घेईल आणि दुखापतीतून बाहेर येण्याचा प्रयत्न करेल.
कमिन्सची कामगिरी
कमिन्सने आयपीएल २०२२ ची सुरुवात चांगली केली होती. त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध त्याचा या हंगामातील पहिला सामना खेळला होता. ज्यात त्याने फलंदाजी करताना सर्वांचे कौतुक मिळवले होते. त्याने १५ चेंडूत नाबाद ५६ धावांची खेळी केली होती. पण, यानंतर त्याला फार खास काही कामगिरी करता आली नाही. पॅट कमिन्सने आयपीएल २०२२ मध्ये खेळताना ५ सामन्यांत ६३ धावा केल्या आणि ७ विकेट्स घेतल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
चेन्नई विरुद्ध ‘कॅप्टन’ रोहित ‘हिट’! कर्णधारांच्या ‘या’ यादीत अन्य कोणी जवळपासही नाही
‘त्याने’ हॅट्रिक घेतली, ५६४ विकेट्स घेतल्या आणि शेवटी कोच बनल्यावर झाले मॅच फिक्सिंगचे आरोप
मुंबई इंडियन्सचा ‘धोनीसेने’विरुद्ध २० वा विजय! पाहा सीएसकेला सर्वाधिकवेळा कोणी केलय पराभूत