भारतात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने रौद्र रूप धारण केले होते. आयपीएलच्या हंगामात देखील मागील आठवड्यात त्याने प्रवेश केला होता. काही संघाचे खेळाडू तसेच सपोर्ट स्टाफला देखील कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे बीसीसीआयने अखेर आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित केले.
मात्र आता त्यामुळे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या आयोजनावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भारतात कोरोनाची परिस्थिती अशीच राहिली तर हा विश्वचषक होईल की नाही, याबाबत शंका आहे. आता यावर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने आपले मत मांडले आहे.
पॅट कमिन्सने भारतातील परिस्थिती अशीच कायम राहिली तर टी२० विश्वचषकाचे आयोजन भारतात करण्यापेक्षा संयुक्त अरब आमिरातीत करावे. कमिन्सने एका वृत्तपत्राशी बोलतांना हे विधान केले. तो म्हणाला, “जर या आयोजनाने भारतातील साधनसंपत्तीवर ताण येणार असेल, जर सुविधा अपुऱ्या पडणार असतील तर हे आयोजन न केलेले बरे. सगळ्यात महत्वाचा प्रश्न हाच आहे की भारतातील सुविधा पुरेशा आहेत का? या प्रश्नाचे उत्तर आधी शोधणे आवश्यक आहे.”
तो म्हणाला, “आत्ताच काही भाष्य करणे घाईघाईचे ठरेल. अजून त्याला ६ महिन्याचा कालावधी आहे. यातील आयोजन समितीने सगळ्यात आधी भारत सरकारशी बोलायला हवे. भारतीय नागरिकांसाठी काय योग्य आहे, यावर हा निर्णय घ्यायला हवा. मागील वर्षी आयपीएलचे आयोजन संयुक्त अरब आमिरातीत केले होते. मात्र यावेळी अनेकांची इच्छा होती की भारतात आयपीएल व्हावे. म्हणून आपल्याला दोन्ही बाजू पाहायला हव्या. त्यानंतरच शक्य असलेला सर्वोत्तम निर्णय घ्यावा.”
महत्त्वाच्या बातम्या-